Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुरीचे भाव १० हजार रुपये क्ंिवटल!

तुरीचे भाव १० हजार रुपये क्ंिवटल!

तुरीचे भाव अचानक वधारले असून, १० हजार रुपये क्ंिवटलप्रमाणे बाजारात खरेदी सुरू आहे. तुरीचे भाव वधारल्याने तूर डाळीचे दर प्रतिक्ंिवटल १० ते १२ हजार

By admin | Published: August 16, 2015 10:03 PM2015-08-16T22:03:56+5:302015-08-16T22:03:56+5:30

तुरीचे भाव अचानक वधारले असून, १० हजार रुपये क्ंिवटलप्रमाणे बाजारात खरेदी सुरू आहे. तुरीचे भाव वधारल्याने तूर डाळीचे दर प्रतिक्ंिवटल १० ते १२ हजार

Rupees ten thousand rupees per kilo! | तुरीचे भाव १० हजार रुपये क्ंिवटल!

तुरीचे भाव १० हजार रुपये क्ंिवटल!

अकोला : तुरीचे भाव अचानक वधारले असून, १० हजार रुपये क्ंिवटलप्रमाणे बाजारात खरेदी सुरू आहे. तुरीचे भाव वधारल्याने तूर डाळीचे दर प्रतिक्ंिवटल १० ते १२ हजार रुपये झाले आहेत. यामुळे गरीब, सामान्य लोकांना जेवणामध्ये डाळीचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे.
देशात गरजेएवढे तुरीचे उत्पादन होत नसल्याने डाळवर्गीय पिकात तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या डाळवर्गीय उत्पादन संचालनालयाने या पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. या डाळीत प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला तूर डाळ मिळण्यासाठी बिल गेटस फाउंडेशनने देशातील काही विद्यापीठांना निधी उपलब्ध केला होता. यात अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही निधी उपलब्ध करू न दिला होता, असे असले तरी आजमितीस देशात तुरीचे एकूण क्षेत्र हे ३९ लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात हे क्षेत्र ११ लाख हेक्टर आहे. पण उत्पादकतेचे प्रमाण कमी आहे. देशातील तुरीच्या डाळीची गरज भागविण्यासाठी या डाळीची आयात ब्रह्मदेशातून करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या तुरीचा पुरवठा कमी झाला असून, मागणी मात्र वाढल्याने तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागीलवर्षी आॅगस्ट महिन्यात तुरीचे भाव ४३०० रुपये प्रतिक्ंिवटल होते. यंदा सुरुवातच साडेसहा हजार रुपये क्ंिवटलने झाली. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही वाढ ७ हजार ते ८ हजार ७०० पर्यंत पोहोचली होती, तर १४ आॅगस्ट रोजी हे दर ९,२०० रुपयांच्यावर पोहोचले
होते.

Web Title: Rupees ten thousand rupees per kilo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.