Join us  

Russia Ukraine War: तेलाच्या महागाईमुळे बिघडणार सर्वसामान्यांचे बजेट; सोने पुन्हा उच्चांक गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 7:11 AM

रशिया व युक्रेनदरम्यानचा संघर्ष चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने कच्चे तेल १४०  डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रशिया व युक्रेनदरम्यानचा संघर्ष चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने कच्चे तेल १४०  डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील शेअर बाजारांत पडझडीचे सत्र कायम असून, भारतीय बाजारही सोमवारी १,४९१ अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदी खरेदीकडे वळले आहेत.

बाजारात ‘ब्लॅक मंडे’कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकावर पोहोचल्याने शेअर बाजार सोमवारी दणकून आपटला. मोठ्या घसरणीसह खुला झालेला शेअर बाजार दिवसभरात १,९६६.७१ अंकांनी खाली आला होता. मात्र, नंतर त्यात काहीशी सुधारणा होत तो अखेर १,४९१ अंकांवर बंद झाला. परिणाम : गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटींचेन नुकसान.  

सोने ५४ हजारांवर युद्धाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने सोने-चांदीची चकाकी पुन्हा वाढली आहे. सोमवारी सोन्याच्या दरात १,५०० रुपयांनी वाढ होऊन ते ५३, ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तर चांदीचे दरही २,७०० रुपये वाढून ती ७१,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.परिणाम :  लगीनसराईत सोने घेणे महाग होणार. 

रुपया गडगडला शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम रुपयावर दिसून आला. आंतर-बँक चलन विनिमयाच्या व्यवहारात रुपया ७६.८५ प्रति डॉलरवर खुला झाला. शुक्रवारीही रुपया २३ पैशांनी घसरून ७६.१७ प्रति डॉलरवर बंद झाला होता. परिणाम :  रुपया घसरल्याने आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. 

टॅग्स :युक्रेन आणि रशियामहागाई