RVNL Share Price Today: गेल्या काही दिवसांपासून डीरेल झालेला रेल्वे स्टॉक आता पुन्हा एकदा मार्गावर येताना दिसत आहे. वर्षभरात १२३ रुपयांवरून ६४७ रुपयांपर्यंत पोहोचलेला मल्टीबॅगर रेल विकास महामंडळाचे (RVNL) शेअर्स आज पुन्हा तेजीत दिसून येत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ५९४.५० रुपयांवर पोहोचला. सकाळी ५७०.७५ रुपयांवर उघडल्यानंतर तो ५६८.६५ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. सकाळच्या सत्रात तो १.७७ टक्क्यांनी वधारून ५८१ रुपयांवर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील विश्लेषकांच्या मते हा शेअर ६२६ रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
२३ रुपयांवरून ६०० रुपयांपार
पाच वर्षांपूर्वी हा शेअर सुमारे २३ रुपयांवर ट्रेड करत होता, पण २०२३ पासून त्यात मोठी तेजी दिसून येत आहे. जुलै २०२४ मध्ये शेअर ६०० रुपयांच्या पुढे गेला. गेल्या पाच वर्षांत कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. या काळात रेल विकास निगमच्या शेअरमध्ये २४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
शेअर ६२६ रुपयांपर्यंत जाऊ शकतो
स्टोक्सबॉक्सने आरव्हीएनएलची टार्गेट प्राइस ६२६ रुपये ठेवली असून स्टॉपलॉस ५३८ रुपये ठेवण्यास सांगितलं आहे. कंपनीने म्हटलंय की, आरव्हीएनएल हे उत्पादन व्यवसायातील अग्रगण्य नाव आहे. पहिल्या तिमाहीचे निकाल कमकुवत असूनही महसुलात २७ टक्के आणि PATमध्ये ३५ टक्के घट झाली आहे. आरव्हीएनएल ८३,२०० कोटी रुपयांच्या मजबूत ऑर्डर बुक आणि धोरणात्मक विस्तारामुळे सकारात्मक आहे, ज्यात उझबेकिस्तानमधील नवीन उपकंपनी आणि इस्रायली भागीदारासह सामंजस्य कराराचा समावेश आहे. उर्वरित तिमाहीत १७,७०० कोटी रुपयांच्या उत्पन्नात वाढ होण्याची कंपनीची अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविशषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)