Lokmat Money > बिझनेस न्यूज > आरबीआयचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आरबीआयचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

S Venkitaramanan: 1990 ते 1992 काळात भारत मोठ्या आर्थिक संकटात असताना त्यांनी पदभार स्विकारला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:09 PM2023-11-18T19:09:31+5:302023-11-18T19:09:57+5:30

S Venkitaramanan: 1990 ते 1992 काळात भारत मोठ्या आर्थिक संकटात असताना त्यांनी पदभार स्विकारला होता.

S Venkitaramanan: Former RBI Governor S Venkitaramanan passes away, breathes his last at 92 | आरबीआयचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आरबीआयचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

RBI S Venkitaramanan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस व्यंकटरमणन (S Venkitaramanan) यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. 1990 ते 1992 काळात वेंकटरामनन यांनी RBI चे 18 वे गव्हर्नर म्हणून काम काम केले. 1985 ते 1989 या काळात त्यांनी वित्त मंत्रालयात वित्त सचिव म्हणूनही काम केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली गिरिजा आणि सुधा असा परिवार आहे. त्यांची मुलगी गिरिजा वैद्यनाथनक या तामिळनाडूच्या माजी मुख्य सचिव होत्या.

एस वेंकटरामणन यांचा जन्म 1931 मध्ये नागरकोइल येथे झाला. हा त्यावेळच्या त्रावणकोर संस्थानाचा भाग होता. देशासमोर गंभीर आर्थिक संकट असताना त्यांनी देशाच्या मध्यवर्ती बँकेचा कार्यभार स्वीकारला होता.

वेंकटरामणन यांच्या कार्यकाळाचे आपल्या वेबसाइटवर वर्णन करताना आरबीआयने म्हटले की, 'त्यांच्या कार्यकाळात देशाला जागतिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या व्यवस्थापनाने देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले. त्यांच्या कार्यकाळातच भारताने आयएमएफचा स्थिरीकरण कार्यक्रम स्वीकारला, जिथे रुपयाचे अवमूल्यन झाले आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू केला.

Web Title: S Venkitaramanan: Former RBI Governor S Venkitaramanan passes away, breathes his last at 92

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.