Join us

सचिन तेंडुलकरचीही 'या' कंपनीत आहे गुंतवणूक, शेअर बाजारात येताच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 1:41 PM

आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिलाय.

Azad Engineering IPO Listing: आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिलाय. कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारावर 35 टक्क्यांहून अधिक वाढीसह 710 रुपयांवर लिस्ट झाले. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये 37 टक्क्यांहून अधिक नफ्यासह 720 रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीच्या आयपीओची किंमत 499 ते 524 रुपये होती. IPO मध्ये आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स 524 रुपयांना वाटप करण्यात आले. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंही आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली आहे.400 टक्क्यांपेक्षा अधिक फायदादिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने यावर्षी मार्चमध्ये आझाद इंजिनिअरिंगमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की जर आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स 524 रुपयांच्या वरच्या किंमतीच्या बँडवर लिस्ट झाले तर तेंडुलकरच्या गुंतवणुकीचं मूल्य 22.96 कोटी रुपये होईल. अशाप्रकारे सचिन तेंडुलकरला त्याच्या गुंतवणुकीवर 9 महिन्यांत 360 टक्के नफा मिळेल. आता आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स बीएसईमध्ये 710 रुपयांवर लिस्ट झाले. यानुसार सचिन तेंडुलकरला त्याच्या गुंतवणुकीवर 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळालाय.

या दिग्गजांचीही गुंतवणूकCNBC-TV 18 च्या रिपोर्टनुसार, सचिन तेंडुलकरच्या आझाद इंजिनिअरिंगमधील स्टेकचे सध्याचे मूल्य 5 कोटी रुपयांवरून 31.5 कोटी रुपये झाले आहे. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त व्हीव्हीएस लक्ष्मण, बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीन, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी कंपनीत पैसे गुंतवले आहेत.

83 पट झाला होता सबस्क्राइबआझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ एकूण 83.04 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 24.51 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा (NII) 90.24 पट, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) चा कोटा 179.64 पट सबस्क्राइब झाला होता. आझाद इंजिनिअरिंगच्या आयपीओमध्ये, किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकणार होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14672 रुपये गुंतवावे लागले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरशेअर बाजारगुंतवणूक