मुंबई - मास्टरब्लास्टर महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या काय करतो, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असेल. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता बिझनेसमन बनला आहे. सचिन सध्या विविध जाहिरातींचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम करतो आहे. त्यामुळेच, तुम्हाला टीव्हीवर दिसणारा सचिन आता मोबाईलवरही दिसू लागलाय. त्यातही तो आपला स्वतंत्र व्यवसायही करत आहे.
डिजिटल एन्टरटेनमेंट अँड टेक्नोलॉजी कंपनी जेटसिंथेसिस (JetSynthesys)ने गुरुवारी सचिनच्या बिझनेस डीलबद्दल माहिती दिली. भारताचा माजी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आपल्या कंपनीत 20 लाख डॉलरची (जवळपास 14.8 करोड़ रुपये) गुंतवणूक केल्याचे कंपनीने सांगितले. जेटसिंथेसिस ही पुण्यातील कंपनी असून भारतासह जपान, ब्रिटेन, यूरोपीय संघ आणि अमेरिकेतही या कंपनीचे कार्यालय आहेत.
सचिनने केलेल्या गुंतवणुकीमुळे कंपनीसोबत त्याचे आणखी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आहेत. यापूर्वीही, डिजिटल क्रिकेट डेस्टिनेशन ‘100एमबी’ आणि इमर्सिव क्रिकेट गेम – ‘सचिन सागा क्रिकेट’ व ‘सचिन सागा वीआर’ यांमध्ये जॉईँट वेंचर आहे. त्यामुळे, या मनोरंजन गेममधील बिझनेसमध्येही सचिनचा सहभाग आहे.
जेथसिंथेसिस कंपनीसोबत जुनेच नाते
क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सचिन जाहीरात आणि उद्योग क्षेत्रातून कमाई करत आहे. जेथसिंथेसेस या कंपनीसोबत माझे 5 वर्षांपासूनचे नाते आहे. सचिन सागा चॅम्पियन्सपासून आम्ही एकत्र प्रवास सुरु केला आहे. त्यास, विशेष व्हर्च्युअर क्रिकेटच्या रिअॅलिटी अनुभवासोबत जोडण्याचा प्रयत्नही यशस्वी केला. हा गेम पॅटर्न या श्रेणीत सर्वात लोकप्रिय असून 2 कोटींपेक्षा अधिकवेळा या डाऊनलोड करण्यात आले आहे, असे सचिनने सांगितले.
दीप्तीचं स्वप्न पूर्ण करणार सचिन
रत्नागिरी येथील 19 वर्षीय दीप्ती विश्वासराव हिचं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सचिन तेंडुलकरने मदतीचा हात पुढे केला आहे. दीप्तीचं स्वप्न पूर्ण झाल्यास रत्नागिरीतील झर्ये गावातील ती पहिली डॉक्टर ठरणार आहे. तेंडुलकर आणि त्याची संस्था सेवा सह्योग फाऊंडेशन यांनी दीप्तीला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.