Lokmat Money > बिझनेस न्यूज > Safest Bank In India: भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत माहितीये? इथे तुमचा पैसा बिलकुल बुडणार नाही

Safest Bank In India: भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत माहितीये? इथे तुमचा पैसा बिलकुल बुडणार नाही

लोक आपल्या कष्टाचे पैसे बँकेत जमा करतात. वेळेला पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण सेव्हिंग करत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 05:57 PM2023-04-17T17:57:12+5:302023-04-17T17:58:20+5:30

लोक आपल्या कष्टाचे पैसे बँकेत जमा करतात. वेळेला पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण सेव्हिंग करत असतो.

Safest Bank In India Do you know which is the safest bank in India Here you will not lose your money at all sbi hdfc icici | Safest Bank In India: भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत माहितीये? इथे तुमचा पैसा बिलकुल बुडणार नाही

Safest Bank In India: भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या आहेत माहितीये? इथे तुमचा पैसा बिलकुल बुडणार नाही

Safest Bank In India: लोक आपल्या कष्टाचे पैसे बँकेत जमा करतात. वेळेला पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण सेव्हिंग करत असतो. पण कधी कधी असं घडतं की बँकच बुडते. मग पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीकडेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमचे पैसे कोणाच्या तरी हाती देण्यापूर्वी समोरची बँक सुरक्षित आहे की नाही हे तपासणे योग्य ठरेल. रिझर्व्ह बँकेनं या वर्षाच्या सुरुवातीला डोमेस्टिक सिस्टीमली इम्पॉर्टंट बँक्स (D-SIBs) २०२२ नावाची यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी २ जानेवारी रोजी एक यादी जारी केली होती. आरबीआयने लिस्ट जारी करून तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत आणि कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत याबाबत माहिती दिली होती. देशातील एखादी मोठी बँक जर बुडाली तर अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्याचे परिणाम ग्राहकांना भोगावे लागतात. 

कोणत्या बँका या यादीत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एका सरकारी आणि २ खाजगी बँकांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहेत. यामध्ये सरकारी क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव आहे. याशिवाय खासगी क्षेत्रातील दोन बँकांचा या यादीत समावेश आहे. यामध्ये एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या नावांचा समावेश आहे. म्हणजे तुमचे खातं SBI मध्ये नसले तरी HDFC बँक किंवा ICICI बँकेत असले तरी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

कोणत्या बँकांचा यात होतो समावेश?
या यादीमध्ये फक्त त्या बँका येतात, ज्यांच्याकडे युज्युअल कॅपिटल कन्झर्व्हेशन बफरशिवाय ॲडिशनल कॉमन इक्विटी टियर १ (CET1) राखणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्यामते SBI ला रिस्क वेटेड असेट्सच्या टक्केवारीनुसार अतिरिक्त ०.६ टक्के सीईटी १ राखावा लागे. त्याचप्रमाणे ICICI बँक आणि HDFC बँक यांना अतिरिक्त ०.२ टक्के राखणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक २०१५ पासून अशा बँकांची यादी प्रसिद्ध करत आहे. अशा बँका देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचं रिझर्व्ह बँकेचं मत आहे.

Web Title: Safest Bank In India Do you know which is the safest bank in India Here you will not lose your money at all sbi hdfc icici

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.