Lokmat Money > बिझनेस न्यूज > सागर अदानी आकाश अंबानीपेक्षा कमी नाही, विकसित भारतासाठी दिला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

सागर अदानी आकाश अंबानीपेक्षा कमी नाही, विकसित भारतासाठी दिला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

Sagar Adani Renewable Energy Plan : सागर अदानी हे सध्या अदानी समूहाच्या ऊर्जा कंपनीचे प्रमुख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत त्यांनी अदानी समूहाची पुढील ५ वर्षांची गुंतवणूक योजना संपूर्ण देशासमोर मांडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:14 PM2024-11-19T12:14:43+5:302024-11-19T12:16:38+5:30

Sagar Adani Renewable Energy Plan : सागर अदानी हे सध्या अदानी समूहाच्या ऊर्जा कंपनीचे प्रमुख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत त्यांनी अदानी समूहाची पुढील ५ वर्षांची गुंतवणूक योजना संपूर्ण देशासमोर मांडली.

sagar adani renewable energy plan invest rs 3 lakh crore in next 5 years | सागर अदानी आकाश अंबानीपेक्षा कमी नाही, विकसित भारतासाठी दिला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

सागर अदानी आकाश अंबानीपेक्षा कमी नाही, विकसित भारतासाठी दिला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

Sagar Adani Renewable Energy Plan : मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच उद्योगपती गौतम अदानी यांची पुढची पिढीही व्यवसायात चांगलं नाव कमावत आहे. अदानी यांचे पुतणे आणि अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली. अदानी समूह येत्या ५ वर्षात देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर, पवन आणि उद्योग उभारण्यासाठी सुमारे ३५ अब्ज डॉलरची (३ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. अदानी समूह जगातील स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत असून ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पुढील ५ वर्षांचा रोडमॅपच सागर अदानी यांनी समोर ठेवला आहे.

अदानी समूहाचा ५ वर्षांचा रोडमॅप
सागर अदानी यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत २०४७ मध्ये विकसित भारतासाठी युवा नेत्यांच्या भूमिकेवर सीईओ पॅनल चर्चेत त्यांनी आपले पुढचे लक्ष्य ठेवलं. अक्षय ऊर्जा क्षेत्रात आमचं काम सुरू झालं असून जगातील कोठेही कोणत्याही कंपनीद्वारे अक्षय ऊर्जा क्षेत्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढील ५ वर्षांत सुमारे ३५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहोत. ही गुंतवणूक सौरऊर्जा, पवन ऊर्जा आणि संकरित (एकाच वेळी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प) प्रकल्पांमध्ये केली जाईल.

अशी आहे योजना?
कंपनी गुजरातमधील खावडा येथे एकाच ठिकाणी ३०,००० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहे. सागर अदानी म्हणाले की, देशाने अणुऊर्जा आणि इतर गोष्टींचाही विचार करण्याची गरज आहे. याबाबत सरकार सक्रियपणे विचार करत आहे. ते म्हणाले की, एकूण गुंतवणुकीपैकी ८५ टक्के गुंतवणूक आपण स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात करणे आवश्यक आहे. पण त्याचवेळी देशातील मागणीच्या स्थितीचाही विचार करायला हवा. म्हणून, आम्ही स्वतःला केवळ अक्षय ऊर्जेपुरते मर्यादित ठेवत नाही. उलट, आम्ही पारंपारिक जीवाश्म (कोळसा इ.) वर देखील काम करत आहोत.

अदानींचे ऊर्जा शेअर्समध्ये घसरण
शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाले तर सोमवारी अदानीच्या एनर्जी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स १.३३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर २.३३ टक्क्यांनी घसरून १४५७ रुपयांवर बंद झाला. अदानी टोटल गॅसचा शेअर २.१३ टक्क्यांच्या घसरणीसह ६६९.६० रुपयांवर बंद झाला. सोमवारी अदानीच्या इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

Web Title: sagar adani renewable energy plan invest rs 3 lakh crore in next 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.