केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल (Sahara Refund Portal) लाँच करणार आहेत. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हे पोर्टल लाँच केलं जाईल. अमित शाह अटल अक्षय ऊर्जा भवनात हे पोर्टल लाँच करतील. ज्यांचा गुंतवणूकीचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांचे पैसे परत करण्यासाठी हे पोर्टल लाँच करण्यात येत आहे. या पोर्टलवर सहाराच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली जाईल.
सहारा इंडियामध्ये देशातील लाखो लोकांचे पैसे अडकले आहेत. सहाराच्या अनेक कंपन्यांमध्ये लोकांचे पैसे अडकून आहेत. दीर्घ काळापासून लोक आपल्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. आता ज्या लोकांची गुंतवणूक मॅच्युअर झाली आहे, त्यांना लवकरच त्यांचे पैसे परत मिळतील. यासाठी सरकार सहारा रिफंड पोर्टल लाँच करत आहे. सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांनी सरकारकडे या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. यानंतर पोर्टलद्वारे आता पैसे परत करण्याबाबत सांगितलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा 'हा' आदेश
सर्वोत्त न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलं होतं की सहारा इंडियाच्या सर्व गुंतवणूकदांना सीआरसीद्वारे पैसे परत केले जावे. आता सहारा रिफंड पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवीत धाल्या आहेत. २०१२ मध्ये सहारा सेबी फंड तयार झाला होता. सहारा सेबी फंडात २४ हजार कोटी रुपये जमा आहेत.