Join us

मुंबईत रस्त्यावर विकलं दूध; आता दिवसाला कमावतोय ३२ कोटी रुपये; आजही करतोय सेल्समनचंच काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:35 IST

Success Story : मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर कधीकाळी दूध विक्री करणाऱ्या तरुणाने आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. फक्त भारतच नाही तर दिदेशातही त्यांचा व्यवसाय वाढला आहे.

Success Story : सेल्समनची नोकरी सर्वात आव्हानात्मक मानली जाते. दिवसात शेकडो ग्राहकांना हाताळणे खायची गोष्ट नाही. पण, अशीच नोकरी करुन एकाने आज तब्बल २०८३० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केलं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने एकेकाळी फूटपाथवर दुधापासून पुस्तकांपर्यंत सर्व काही विकले होते. मात्र, आजही त्यांचे काम बदलले नाही. पण, आता ते महागडी प्रॉपर्टी विकत आहेत. आपण चर्चा करतोय रिअल इस्टेट क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे उद्योगपती रिझवान साजन यांच्याबद्दल. रिझवान यांनी मुंबईच्या रस्त्यावरून थेट सौदी अरेबियाच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिझवान साजन म्हणतात की श्रीमंत होण्यासाठी पैशाची गरज नाही तर कौशल्याची गरज आहे.

एकेकाळी मुंबईच्या गल्ली-बोळात संघर्ष करणारा रिझवान साजन आता सौदी अरेबियात अनिवासी भारतीय व्यापारी आहे. रिझवान साजन यांनी सेल्समन म्हणून करिअरची सुरुवात केली. आपल्या कौशल्याने त्यांनी अल्पावधीत मोठं यश संपादन केले. आज ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत. 'डॅन्यूब ग्रुप' ह्या नावाने रिझवान साजन यांचा रिअल इस्टेट क्षेत्रात एक अब्ज डॉलरचा व्यवसाय आहे. ही कंपनी सौदी अरेबिया, ओमान, बहरीन, कतार आणि भारतासह जगातील सर्वात मोठ्या बांधकाम साहित्य कंपन्यांपैकी एक आहे.

मुंबई ते दुबई प्रवासखास गोष्ट म्हणजे रिजवान साजन यांना स्वतःवर इतका विश्वास आहे की ते म्हणतात, “माझे सगळे पैसे गेले तर मी पुन्हा माझे व्यवसाय साम्राज्य निर्माण करेन.” आफ्रिकेतील जंगलातही मी पैसे कमवू शकतो, असा दावा त्यांनी केला. रिजवान साजन यांचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सुरुवातीच्या दिवसांत ते फूटपाथवर माल विकायचे. वडिलांच्या निधनानंतर रिजवान साजन १९८१ मध्ये कुवेतला गेले. येथे त्यांनी प्रशिक्षणार्थी सेल्समन म्हणून काम केले.

१९९३ मध्ये, त्यांनी डॅन्यूब ग्रुप सुरू केला, जो आता बांधकाम साहित्य, गृह सजावट आणि रिअल इस्टेट विकासामधील आघाडीचा खेळाडू बनला आहे. DNA अहवालानुसार, UAE वित्त मंत्रालयाच्या वेबसाइटवर रिझवान साजन यांची एकूण संपत्ती २.५ अब्ज अमेरिकन डॉलर (२०,८३० कोटी रुपये) आहे. 

टॅग्स :व्यवसायबांधकाम उद्योगसौदी अरेबियापैसा