लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नाेकरदारवर्गाला दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पगारवाढीचे वेध लागतात. शहरी भागातील लाेकांना सरासरी ८ टक्के पगारवाढ मिळाली आहे. तर ग्रामीण भागातील कर्मचारी मात्र वंचित राहिले आहेत.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एक अहवाल सादर केला आहे. त्यात आर्थिक वर्ष २०२२-२३ चा आढावा घेण्यात आला असून पहिल्या तिमाहीत पगारवाढीनंतर शहरी भागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन २१ हजार ६४७ रुपये झाले. ग्रामीण भागातील नाेकरदार वर्गाचा सरासरी पगारात १८ महिन्यांनंतरही वाढलेला नाही.
३० लाख काेटी रुपये खासगी कंपन्यांनी पगारावर खर्च केले.
२८ लाख काेटी रुपये सरकारी कंपन्यांचा पगारावर खर्च.
एकूण वेतनात काेणाचा किती वाटा?
आयटी ४२%
बँक-फायनान्स १२%
औद्याेगिक ०८%
वाहन ०९%
आराेग्य ०६%
धातू ०५%
एफएमसीजी ०४%
इतर १३%
राेजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी वाढली आहे.
३८५ रुपयांवरून ४६४ रुपये एवढी एका दिवसाची मजुरी शहरांमध्ये झाली आहे.
३०२ रुपयांवरून ३६८ रुपये एवढी मजुरी ग्रामीण भागात झाली आहे.
अशी झाली पगारवाढ-कपात
तिमाही ग्रामीण शहर
सप्टेंबर २०२१ १३,१०० २०,०२०
डिसेंबर २०२१ १४,७०० २०,२००
मार्च २०२२ १४,५०० १९,८००
जून २०२२ १४,२०० २०,०३०
सप्टेंबर २०२२ १५,७०० २०,१००
डिसेंबर २०२२ १५,२०० २०,८००
मार्च २०२३ १४,७०० २१,६४५
संघटित क्षेत्रात नाेकऱ्या वाढल्या
मे महिन्यात नाेकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आकडेवारीतून ही माहिती समाेर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे.
२०.२३ लाख नवे कर्मचारी जाेडले.
९.४० लाख कर्मचाऱ्यांचे वय २५ वर्षांच्या आत.
३.९६ महिला सदस्य.
७१ तृतीयपंथी सदस्य.