Join us

पगार ५० हजार, नवीन की जुना टॅक्स स्लॅबपैकी कोणता तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 6:58 PM

तुम्ही 80C अंतर्गत १.५ लाख रुपये वाचवू शकता. यासाठी EPF, PPF, ELSS, NSC मध्ये गुंतवणूक करावी लागेल

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०२२-२३ संपायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी आयकर मर्यादा वाढवली जाईल अशी आशा सर्वसामान्यांना आहे. अर्थसंकल्प येताच सर्वसामान्यांचे लक्ष टॅक्स स्लॅबमध्ये होणाऱ्या बदलाकडे जाते. परंतु तुम्हाला माहित्येय का? देशात इन्कम टॅक्ससाठी सरकारने किती स्लॅब बनवलेत आणि त्यात काय तरतुदी आहेत? चला तर, मग जाणून घेऊ. 

मागील काही अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये फार मोठा बदल पाहायला मिळाला नाही. सध्या टॅक्स स्लॅबमध्ये २ पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या प्रणालीनुसार, ज्याला ओल्ड टॅक्स स्लॅब म्हणून ओळखलं जाते. तर २०२० मध्ये सरकारने करदात्यांना दिलासा देत नवीन टॅक्स स्लॅब सुरू केला होता. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करताना सुलभ जावो यासाठी नवीन टॅक्स प्रणाली सुरू करण्यात आली. पण नव्या टॅक्स स्लॅबसोबत सरकारने जुना टॅक्स स्लॅबही कायम ठेवला. 

जुना टॅक्स स्लॅब काय आहे?यामध्ये ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर जमा करावा लागणार नाही. याशिवाय कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर जमा करण्यापासून सूट आहे. त्यानुसार करदात्यांना सुमारे ६.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. जुन्या कर प्रणाली किंवा जुन्या कर स्लॅबमधील आयकर दर मुख्यत्वे तुमच्या उत्पन्नावर आणि उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून असतो.

५० हजारांच्या पगारावर किती कर?जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल आणि उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसेल तर वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये होते. या परिस्थितीत, जेव्हा तुम्ही जुनी कर रचना निवडता, तेव्हा तुम्हाला आयकर (IT ACT 80C) च्या कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा लाभ मिळतो. याशिवाय पगारदार लोकांना ५०,००० रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभही मिळतो.

सूट मिळवाजुन्या रचनेत २.५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. यानंतर २.५ लाख ते ५ लाखांच्या उत्पन्नावर ५% कर आकारला जातो, परंतु सरकारकडून १२,५०० रुपयांची सूट मिळाल्याने हे देखील शून्य होते. याचा अर्थ जुन्या कर रचनेत तुम्हाला पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. आयकर नियम स्पष्टपणे सांगतात की ५ लाख रुपयांच्या उत्पन्नावरील कर १२,५०० रुपये (२.५ लाख रुपयांच्या ५%) आहे. आयकर कलम 87A अंतर्गत, तुम्हाला १२,५०० रुपयांच्या सवलतीवर कोणताही कर भरावा लागणार नाही. ५ लाख स्लॅबवर शून्य कर भरावा लागेल.

नवीन कर रचना काय आहे?नवीन कर रचनेत २.५० लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. यानंतर २.५ लाख रुपयांवर ५ टक्के कर आकारला जातो, जो १२,५०० रुपये होतो. आणि वार्षिक ६ लाख पगारावर, कर रु. २३,४०० आहे. जर उत्पन्न ५ लाखाहून १ लाख रुपये जास्त असेल तर १ लाख रुपयांची रक्कम १० टक्के ब्रॅकेटमध्ये येते. त्यामुळे यावर १०,००० रुपये कर भरावा लागतो. याशिवाय, कॅलक्युलेटेड केलेल्या करावर ४% उपकर आहे. जर कर १२,५०० रुपये असेल तर उपकर ९०० रुपये होईल.

६ लाखांचे उत्पन्न करमुक्त कसे होणार?तुम्ही 80C अंतर्गत १.५ लाख रुपये वाचवू शकता. यासाठी EPF, PPF, ELSS, NSC मध्ये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये वार्षिक ५०,००० रुपयांपर्यंत स्वतंत्रपणे गुंतवणूक केल्यास, कलम 80CCD (1B) अंतर्गत तुम्ही अतिरिक्त ५०,००० रुपये आयकर सवलत मिळवू शकता. गृहकर्ज घेणारे अतिरिक्त २ लाख रुपये वाचवू शकतात. 

टॅग्स :इन्कम टॅक्स