Lokmat Money > बिझनेस न्यूज > Salary: यंदा ८-१२% पगारवाढ, कंपन्यांकडून होतंय असं नियोजन

Salary: यंदा ८-१२% पगारवाढ, कंपन्यांकडून होतंय असं नियोजन

Employee Salary: भारतात यंदा सरासरी ८ ते १२ टक्के वेतनवाढ मिळेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वस्तू उत्पादन व पायाभूत क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील अधिक सकारात्मक गुंतवणूक अंदाजामुळे वेतनवाढ चांगली राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:49 AM2022-04-08T04:49:38+5:302022-04-08T04:50:06+5:30

Employee Salary: भारतात यंदा सरासरी ८ ते १२ टक्के वेतनवाढ मिळेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वस्तू उत्पादन व पायाभूत क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील अधिक सकारात्मक गुंतवणूक अंदाजामुळे वेतनवाढ चांगली राहील

Salary: 8-12% salary increase this year, planning by companies | Salary: यंदा ८-१२% पगारवाढ, कंपन्यांकडून होतंय असं नियोजन

Salary: यंदा ८-१२% पगारवाढ, कंपन्यांकडून होतंय असं नियोजन

 मुंबई : भारतात यंदा सरासरी ८ ते १२ टक्के वेतनवाढ मिळेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. वस्तू उत्पादन व पायाभूत क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील अधिक सकारात्मक गुंतवणूक अंदाजामुळे वेतनवाढ चांगली राहील, असे या अहवालात  म्हटले आहे. ‘मायकेल पेज सॅलरी रिपोर्ट २०२२’नुसार, सन २०२२ मध्ये भारतातील सामान्य वेतनवाढ ९ टक्के राहील. स्टार्टअप आणि युनिकॉर्नसह नव्या काळातील आधुनिक कंपन्यांकडून जवळपास १२ टक्के वेतनवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. अत्युच्य कामगिरी करणाऱ्या व विशेष कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना सरासरीपेक्षा अधिक (२०-२५%) वेतनवाढ मिळू शकेल. 
कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडू नये यासाठी... 
अहवालानुसार, चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून जाऊ नये, यासाठी कंपन्यांनी नवनव्या लाभकारी योजना हाती घेतल्या आहेत. वेतनवाढ तिमाही अथवा सहामाही चक्र पद्धतीने राबविणे, पदोन्नत्या, व्हेरियेबल पे-आउट्स, प्रोत्साहन लाभ, रिटेन्शन बोनस आणि मध्यावधी वेतनवाढ यांचा त्यामध्ये समावेश आहे.

Web Title: Salary: 8-12% salary increase this year, planning by companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.