Join us

वेतनाबरोबर मिळतात हे आठ भत्ते, कसा कराल क्लेम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2018 1:07 PM

तुम्हाला वेतनासोबतच मिळणाऱ्या भत्त्यांची माहिती असणे गरजेच आहे. त्यामुळं आज आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहे. 

नवी दिल्ली - तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये अनेक भत्त्यांची नोंद असते. यामधील काहीवर टॅक्स लागू असतो तर काही भत्त्यांना टॅक्समधून सूट मिळते.  तुम्हाला वेतनासोबतच मिळणाऱ्या भत्त्यांची माहिती असणे गरजेच आहे. त्यामुळं आज आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहे. 

घर भाडे भत्ता (एचआरए) - जर तुमच्या वेतनमाध्ये घर भाडे भत्ता असेल आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहत असेल तर यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. पण ही सुट तुम्हाला नियमांनुसार मिळते.  तुम्ही जर कोणत्याही प्रकराचे घरभाडे भरत नसाल तरीही वेतनामध्ये मिळणारे घरभाड्यावर टॅक्स लागू होत नाही. 

ट्रांसपोर्ट अलाउंस (TA) :  जर तुमच्या वेतनामध्ये ट्रांसपोर्ट अलाउंस असेल तर तुम्हाला वर्षाला 19200 रुपयांवर टॅक्स लागू होणार नाही. नेत्रहीन, बधिर आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना 3200 रुपये वर्षाकाठी ट्रांसपोर्ट अलाउंस मिळतो. 

एक फेब्रुवारी रोजी केंद्रात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने यावेळी ट्रांसपोर्ट अलाउंस आणि मेडिकल रिइंवर्शमेंट बंद केले आहे. त्यामुळं पुढच्यावर्षीपासून तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. त्याजाग्यावर स्टँडर्ड डिजक्शन मिळणार आहे. 

एलटीए - वेतनामधून मिळणाऱ्या एलटीएवरही तुम्हीला टॅक्स सूट मिळू शकतो. पण यासाठी काही नियम आणी अटी लागू असतील. एलटीए आपण चार वर्षांमध्ये दोन वेळा घेऊ शकता. यामध्ये विमान यात्रा किंवा रेल्वे प्रवासही यामध्ये सामाविष्ठ करता येईल. 

महागाई भत्ता -  सरकारी कर्मचाऱ्यांसह इतर सर्वच कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळतो. यावर टॅक्स सूट नाही. त्यामुळं जर तुम्हाला महागाई भत्ता मिळत असेल तर तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल. 

मेडिकल रिइंबर्समेंट: त्यामच्या वेतनामध्ये मेडिकल रिइंबर्समेंट सामाविष्ठ असेल तर तुम्हाला 15 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स लागणार नाही. मेडिकल रिइंबर्समेंट द्वारे तुमच्या कुटुंबिंयाचा मेडिकल खर्च मिळतो. यासाठी तुम्हाला रुग्णालयातील बिले जोडण्याची अवशकता आहे. पण पुढच्यावर्षीपासून सरकारने मेडिकल रिइंबर्समेंट बंद केली आहे. 

फिक्स्ड मेडिकल अलाउंस :  तुमच्या वेतनामध्ये फिक्स्ड मेडिकल अलाउंस  असेल तर तुम्हाला त्यावर टॅक्स सूट मिळणार नाही. मेडिकल रिइंबर्समेंट आणि फिक्स्ड मेडिकल अलाउंस हे दोन्ही वेगळं आहे. त्यामुळं दोन्हीला जोडण्याचा विचार करु नका. 

मुलांच्या शिक्षणाचा भत्ता - तुमच्या वेतनामध्ये चिल्ड्रन एजुकेशन अलाउंस असेल तर यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. यासाठीही एक अट आहे. चिल्ड्रन एजुकेशन अलाउंसमुळं तुम्हाला वर्षाला 1200 रुपये टॅक्स सूट मिळते. ही सुट फक्त दोन मुलांसाठी असणार आहे. त्यापेक्षा आधिक मुलं असतील तर तुम्हाला या सुविधेचा लाग घेता येणार नाही. 

स्पेशल अलाउंस - कित्येकवेळी आपल्या कर्मचाऱ्यांना स्पेशल भत्ता देते. अशावेळी यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो.