Lokmat Money > बिझनेस न्यूज > Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

Salary Hike in 2021: पाहा काय म्हणतोय अहवाल, किती होणार वेतनवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 10:08 AM2021-02-24T10:08:57+5:302021-02-24T10:12:04+5:30

Salary Hike in 2021: पाहा काय म्हणतोय अहवाल, किती होणार वेतनवाढ

salary hike in 2021 indian companies to increase salary by 7 7 percent in current year latest survey | Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

Salary Hike in 2021: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ, सर्वेक्षणातून खुलासा

Highlightsगेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक कंपन्या वेतनवाढीसाठी सकारात्मक गेल्यावर्षी कर्मचाऱ्यांची ६.१ टक्का वेतनवाढ झाली होती

Salary Hike in 2021: जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वेतन वाढ मिळण्याची शक्यता एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय कंपन्या यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास ७.७ टक्के वेतनवाढ करण्याची तयार करत असल्याचं म्हटलं जात आहे. वृत्तानुसार यामध्ये भारत. चीन, रशिया आणि ब्राझील या देशांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ही शक्यता एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६.१ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यापेक्षा यावर्षी होणारी वाढ ही अधिक आहे. जागतिक कंपनी AON plc नं मंगळवारी आपली भारतातील वेतन वाढीवरील आपला अहवाल जारी केला. या सर्वेक्षणात सामील असलेल्या ८८ टक्के कंपन्यांनी २०२१ या वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा आपला विचार असल्याचं म्हटलं आहे. २०२० मध्ये वेतन वाढीस तयार असलेल्या कंपन्यांची संख्या ७५ टक्के इतकी होती. 

हजारो कंपन्यांचा सहभाग

या सर्वेक्षणात २० उद्योगांमधील १ हजार २०० पेक्षा अधिक कंपन्यांना सामील करून घेण्यात आलं होतं. या सर्वेक्षणानुसार मोठ्या प्रमाणात वेतनवाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. तसंच नव्या कायद्यामुळेही काही बदल होण्याची शक्यता असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. 

तरतूदी कराव्या लागणार

"नव्या श्रम कायद्याअंतर्गत वेतनाच्या नव्या व्याख्येनुसार ग्रॅच्युटी, सुट्ट्यांच्या मोबदल्यात पैसे तसंच भविष्य निर्वाह निधीसाठी अधिक तरतूद करण्याची आवश्यकता असेल. श्रम कायद्याच्या आकलनानंतर कंपन्या वर्षाच्या दुसरा सहामाहीत आपल्या वेतनाच्या बजेटची समीक्षा करतील," असं मत एऑनचे भारतातील परफॉर्मन्स अँड रिवॉर्ड्स व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन सेठी यांनी सांगितलं. 

 

 

Read in English

Web Title: salary hike in 2021 indian companies to increase salary by 7 7 percent in current year latest survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.