Join us

Salary Increment: पगारवाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर; गेल्या ५ वर्षांचा रेकॉर्ड तोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 7:00 PM

Salary Increment: यंदा कंपन्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणि सकारात्मकतेमुळे मोठी पगारवाढ देण्याची शक्यता आहे. ही पगारपाढ गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक असेल.

नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कंपन्यांमध्ये पगारवाढीचे समीकरण मांडण्यास सुरुवात झाली आहे. वर्षभर मेहनत करून तुम्ही कोरोना काळातही कंपनीला चांगले काम करून दाखविले आहे. या मेहनतीचे फळ घेण्याची वेळ आली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे चांगली इन्क्रीमेंट मिळालेली नाही. यामुळे यंदा कोरोनाच्या लाटेचा तेवढा प्रभाव दिसला नसल्याने पगारवाढही घसघशीत होणार आहे. (Salary Hike Survey)

यंदा कंपन्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणि सकारात्मकतेमुळे मोठी पगारवाढ देण्याची शक्यता आहे. ही पगारपाढ गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक असेल. जवळपास ९.९ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता एका सर्व्हेमध्ये व्यक्त करणअयात आली आहे. 

देशातील अग्रगण्य जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी Aon च्या 26 व्या वेतनवाढीच्या सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये पगारवाढ 9.9 टक्के असेल असा विश्वास विविध क्षेत्रातील संघटनांनी व्यक्त केला आहे. 2021 मध्ये ते 9.3 टक्के होते. सर्वेक्षणात 40 हून अधिक उद्योगांमधील 1,500 कंपन्यांच्या डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हे सांगण्यात आले आहे. सर्वाधिक पगारवाढ देणाऱ्या या कंपन्यांमध्ये ई-कॉमर्स आणि व्हेंचर कॅपिटल, हाय-टेक/आयटी आणि आयटीईएससह लाईफ सायन्स सेवांचा समावेश आहे.

टॅग्स :कर्मचारी