Salary of CEO in India: तुम्ही अनेकदा कँपस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना इतक्या लाखाचे पॅकेज मिळाले किंवा अमुक एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना इतकी पगार देते, अशा चर्चा ऐकल्या असतील. पण, भारतात विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजेच CEO किती पगार घेतात? असा प्रश्न तुमच्या मनात कधी आलाय का? नक्कीच सर्व कंपन्यांमध्ये इतर कर्मचाऱ्यांपेक्षा सीईओंना सर्वाधिक पगार मिळतो.
तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण भारतात सीईओची अॅव्हरेज पगार कोट्यवधींमध्ये आहे. ‘डेलॉयट इंडिया एक्झिक्यूटिव्ह परफॉर्मेंस अँड रिवार्ड्स सर्व्हे 2024’नुसार, भारतातील CEO's चे सरासरी वेतन 13.8 कोटी रुपये आहे. सर्व्हेनुसार, प्रमोटर्स किंवा प्रमोटर्स कुटुंबातील सदस्य असलेल्या सीईओंना सरासरी 16.7 कोटी रुपये वेतन दिले जाते. हे कोव्हिड-19 महामारीपूर्वी मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे.
डेलॉइट इंडियाचे भागीदार आणि सीएचआरओ कार्यक्रमाचे प्रमुख आनंदरुप घोष म्हणाले की, प्रमोटर्स सीईओंचे मानधन, हे व्यावसायिक सीईओंपेक्षा जास्त आहे. हे प्रामुख्याने दोन कारणांसाठी आहे. प्रमोटर्स सीईओंच्या तुलनेत व्यावसायिक सीईओ वारंवार बदलत राहतात. दुसरे म्हणजे, प्रमोटर्स सीईओंसाठी भरपाईची श्रेणी खूप विस्तृत आहे आणि याचा परिणाम सरासरीवर होतो. प्रमोटर्स सीईओंना दिले जाणारे 47 टक्के वेतन जोखमीवर आधारित आहे, तर व्यावसायिक सीईओंसाठी 57 टक्के आहे.