Lokmat Money > बिझनेस न्यूज > तातडीच्या गरजेसाठी सॅलरी ओव्हरड्राफ्ट; नाेकरदारांना बँकांकडून मिळते सुविधा

तातडीच्या गरजेसाठी सॅलरी ओव्हरड्राफ्ट; नाेकरदारांना बँकांकडून मिळते सुविधा

खासगी आणि सरकारी बँकांकडून ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी बँकांचे नियम वेगवेगळे असू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:11 AM2021-06-14T06:11:53+5:302021-06-14T06:12:05+5:30

खासगी आणि सरकारी बँकांकडून ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी बँकांचे नियम वेगवेगळे असू शकतात.

Salary overdraft for urgent needs; Bankers get facilities from banks | तातडीच्या गरजेसाठी सॅलरी ओव्हरड्राफ्ट; नाेकरदारांना बँकांकडून मिळते सुविधा

तातडीच्या गरजेसाठी सॅलरी ओव्हरड्राफ्ट; नाेकरदारांना बँकांकडून मिळते सुविधा

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामाेरे जावे लागले. अशा परिस्थितीत पर्सनल लाेन घेण्याचा पर्याय समाेर असताे. मात्र, त्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे पैशांची गरज तत्काळ पूर्ण करायची असल्यास इन्स्टंट लाेनच्या स्वरूपात एक पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय आहे सॅलरी ओव्हरड्राफ्टचा. नाेकरदार वर्गासाठी हा एक चांगला पर्याय आहे. 

सॅलरी ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचे कर्ज आहे. नाेकरदार वर्गाला त्याचा लाभ घेता येताे. बँकांकडून ही सुविधा मिळते. त्याद्वारे काही मिनिटांमध्ये पैसे खात्यात जमा हाेतात. 
खासगी आणि सरकारी बँकांकडून ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी बँकांचे नियम वेगवेगळे असू शकतात. कर्ज द्यावे की नाही, हे अनेक गाेष्टींवर अवलंबून असते. सॅलरी ओव्हरड्राफ्ट द्यायचा की नाही, हे बँक काही माहिती तपासून ठरविते. काही ठराविक खातेदारांना बँक ही सुविधा देत 
असते. 

सॅलरी ओव्हरड्राफ्टसाठी निधीची मर्यादा असते. वेतनाच्या दाेन ते तीन पट रक्कम मिळू शकते. काही बॅँका मात्र वेतनापेक्षा कमी रक्कम देतात. सॅलरी ओव्हरड्राफ्ट हे इन्स्टंट लाेन असल्यामुळे त्यासाठी आकारण्यात येणारा व्याजदर जास्त असते.  परतफेड मासिक हफ्त्यानुसार नसते. मात्र, परतफेडीस जास्त वेळ घेतल्यास व्याज जास्त भरावे लागते.

Web Title: Salary overdraft for urgent needs; Bankers get facilities from banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक