नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढीची भेट मिळू शकते. केंद्राने यापूर्वीच महागाई भत्त्यात वाढ केली हाेती. मात्र, कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत हाेती. ती पूर्ण हाेण्याची दाट शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर का महत्त्वाचा? फिटमेंट फॅक्टरवरून कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित हाेते. सहाव्या वेतन आयाेगानुसार मिळणाऱ्या मूळ वेतनाला या फॅक्टरने गुणिले जाते. त्यानंतर मूळ वेतन निश्चित हाेते. सध्या २.५७ या फॅक्टरच्या आधारे किमान १८ हजार रुपये एवढे मूळ वेतन आहे. फिटमेंट फॅक्टर ३.६८% झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन २६ हजार रुपये एवढे हाेईल.
२.५७%एवढा फिटमेंट फॅक्टर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरलेला आहे. यात वाढ झाल्यास पगारात माेठी वाढ हाेते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात हा घटक खूप महत्त्वाचा ठरताे. ३.६८%एवढा वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. या वर्षाखेरीस फिटमेंट फॅक्टरबाबत केंद्रातर्फे निर्णय घेतला जाऊ शकताे.
सध्याचा पगार (इतर भत्ते वगळून)१८,००० X २.५७ ४६,२६० रुपये
फिटमेंट फॅक्टर वाढल्यास २६,००० X ३.६८ ९५,६८० रुपये
सातव्या वेतन आयाेगाच्या शिफारसीनुसार फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे.१ जुलै २०२२ला केंद्राने महागाई भत्ता ३४%वरून ३८ टक्के केला. सध्या कर्मचारी फिटमेंट फॅक्टरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
४८ लाखaकेंद्र सरकारीकर्मचारी ६० लाखनिवृत्तिवेतनधारक