Lokmat Money > बिझनेस न्यूज > घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर!

घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर!

1 महिन्यात शेअरमध्ये 100% हून अधिकची तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:31 PM2024-02-01T18:31:39+5:302024-02-01T18:32:02+5:30

1 महिन्यात शेअरमध्ये 100% हून अधिकची तेजी

salasar techno share has become a storm'even in the falling market, the company has given 4 bonus shares! | घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर!

घसरत्या बाजारातही 'तुफान' बनला हा स्टॉक, कंपनीनं दिले आहेत 4 बोनस शेअर!

शेअर बाजारातील घसरणीतही स्मॉलकॅप कंपनी सालासर टेक्नो इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली आहे. सालासर टेक्नोचा शेअर गुरुवारी 10 टक्क्यांनी वधारून 28.19 रुपयांवर पोहोचला आहे. सालासर टेक्नोच्या शेअर्समध्ये ही वाढ बोनस शेअर्सच्या एक्स डेटला झाली आहे. स्मॉलकॅप कंपनीने 4:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. महत्वाचे म्हणजे, कंपनीने 1 फेब्रुवारी 2024 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती.

1 महिन्यात शेअरमध्ये 100% हून अधिकची तेजी -
सालासर टेक्नो इंजिनिअरिंगचा शेअर गेल्या एका महिन्यात 100% हून अधिक वधारला आहे. सालासर टेक्नोचा शेअर 1 जानेवारी 2024 रोजी 66.76 रुपयांवर होता. 31 जानेवारी 2024 रोजी तो 128.16 रुपयांवर पोहोचला. 1 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्येक शेअरवर 4 बोनस शेअर्स दिल्यानंतर, सालासर टेक्नोचा शेअर 10% ने वधारून 28.19 रुपयांवर पोहोचला आहे. 1 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत सालासर टेक्नोच्या शेअर्समध्ये 100% हून अधिक वाढ झाली आहे.

कंपनीने दुसऱ्यांदा दिले आहेत बोनस शेअर -
सालासर टेक्नो इंजिनिअरिंगने आपल्या गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने आता 4:1 या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक शेअरमागे 4 बोनस शेअर दिले आहेत. सालासर टेक्नोने यापूर्वी जुलै 2021 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक शेअरमागे 1 बोनस शेअर दिला होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Read in English

Web Title: salasar techno share has become a storm'even in the falling market, the company has given 4 bonus shares!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.