Lokmat Money > बिझनेस न्यूज > महाराष्ट्रात १.१९ लाख मालमत्तांची विक्री; सप्टेंबरमधील स्थिती

महाराष्ट्रात १.१९ लाख मालमत्तांची विक्री; सप्टेंबरमधील स्थिती

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 02:58 AM2020-10-08T02:58:33+5:302020-10-08T02:58:42+5:30

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा सकारात्मक परिणाम

Sale of 1 19 lakh properties in Maharashtra | महाराष्ट्रात १.१९ लाख मालमत्तांची विक्री; सप्टेंबरमधील स्थिती

महाराष्ट्रात १.१९ लाख मालमत्तांची विक्री; सप्टेंबरमधील स्थिती

मुंबई : सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात १,१९,८३४ वास्तव मालमत्तांची (रिअल इस्टेट) विक्री झाली असून, ही विक्री आॅगस्टमधील ८२,१०० मालमत्तांच्या विक्रीच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधील ८०,३४९ मालमत्तांच्या विक्रीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमधील विक्री ४९ टक्के अधिक आहे.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये मुंबईत मालमत्तांच्या विक्रीत आदल्या महिन्याच्या तुलनेत ११२ टक्के वाढ झाली आहे. राज्याच्या निबंधन महानिरीक्षकांकडे (आयजीआर) ५,५९७ विक्री व हस्तांतरण दस्तांची नोंदणी झाली आहे. आॅगस्टमध्ये हा आकडा २,६४२ होता.
मालमत्ता क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुद्र्रांक शुल्कात याआधीच सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या काळात नोंदणी होणाऱ्या मालमत्तांवरील मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत मिळणार आहे. तसेच १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या काळातील नोंदणीवर २ टक्के सवलत मिळणार आहे. सवलतीमुळे मुंबईतील मुद्रांक शुल्क सध्या ६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आले आहे.

व्यवहारांची संख्या वाढली
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्यात मालमत्ता बाजाराचा समावेश होता. त्यात आता सुधारणा होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही नोंदणी झालेल्या व्यवहारांची संख्याही ३९ टक्क्यांनी वाढली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, मुद्रांक शुल्कातील कपातीचा अपेक्षित परिणाम दिसून आला आहे. २५ आॅगस्टपासून मालमत्ता विक्रीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

Web Title: Sale of 1 19 lakh properties in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.