मुंबई : फोक्सवॅगनच्या गाड्यांचा बनाव उघड झाल्यावरही भारतात मौन बाळगणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘पोलो’ या हॅचबॅक श्रेणीतील गाडीची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश वितरकांना दिले आहेत. कंपनीच्या अन्य मॉडेलच्या तुलनेत विक्रीच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास हे मॉडेल लोकप्रिय मानले जाते. मात्र, याची विक्री कंपनीने थांबविली आहे. परंतु, हा निर्णय घेतानाही कोणतेही कारण कंपनीने स्पष्ट केलेली नाही. हा घोटाहा उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या विक्रीत घट झाली आहे.
भयावह प्रदूषण करणाऱ्या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने पोलोची विक्री थांबविण्याचे कोणतेही ठोस कारण न दिल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे चित्र आहे. उपलब्ध माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात कंपनीने एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत एकूण २०,०३० वाहनांची निर्मिती केली.
यापैकी १३,८२७ पोलो गाड्यांची कंपनीने भारतात विक्री केली तर सुमारे ६०५२ पोलो गाड्यांची निर्यात केली आहे. भारतात पोलोची विक्री थांबविली असली तरी ज्या गाड्यांची निर्यात झाली आहे, त्यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फोक्सवॅगन कंपनीचा महाराष्ट्रातही प्रकल्प असून तो पुण्यात आहे. या प्रकल्पातून वर्षाकाठी एक लाख ३० हजार वाहनांची निर्मिती कंपनी करते.
या घोटाळाप्रकरणी कंपनीने चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या फसवणुकीच्या प्रकरणाची वरिष्ठांना माहिती नसावी यावर म्यूलर यांना विश्वास नाही. या प्रकरणामागे नेमके कोण आहे, याचा तपास सुरू आहे. तपासात १.१ कोटी डिझेल कारला प्रदूषण फैलावणारे सॉफ्टवेअर बसविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
आॅस्ट्रेलियात ९० हजार गाड्या आढळल्या
‘इए-१८९’ इंजिनमध्ये कंपनीने बनाव केल्याचे उघड झाल्यानंतर आता विविध देशांतून विक्री झालेल्या गाड्यांची माहिती उजेडात येत आहे. आॅस्ट्रेलियातही कंपनीच्या गाड्यांची संख्या मोठी असून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष वेबसाईट तयार करण्यात आली असून तिथे आपल्या गाडीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल ९० हजार ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या असून त्यांच्या गाड्याचे इंजिन ‘इए-१८९’ बनावटीचे आहे. (प्रतिनिधी)
कारच्या इंजिनाचा विकास करणाऱ्या विभागातील जबाबदार तिघांसह चौघांना निलंबित करण्यात आले असून, अन्य काही जण आंशिक सेवानिवृत्तीवर आहेत.
- मॅथायस म्यूलर, मुख्य कार्यकारी अधिकारी, फोक्सवॅगन
भारतात ‘पोलो’ची विक्री स्थगित
फोक्सवॅगनच्या गाड्यांचा बनाव उघड झाल्यावरही भारतात मौन बाळगणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘पोलो’ या हॅचबॅक श्रेणीतील गाडीची विक्री तातडीने थांबविण्याचे
By admin | Published: October 8, 2015 05:07 AM2015-10-08T05:07:00+5:302015-10-08T05:07:00+5:30