टोकिओ : मे महिन्यामध्ये जपानमधील वाहन उत्पादकांच्या जागतिक विक्रीमध्ये ३८ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये जपानमधील वाहन विक्री घटली असून, हा लॉकडाऊनचा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
जपानमधील सात प्रमुख ऑटो उत्पादकांनी मे महिन्यामध्ये १.४७ दशलक्ष वाहने विकली. मागील वर्षाच्या मे महिन्यात त्यांनी २.३८ दशलक्ष वाहनांची विक्री केली होती. एप्रिल महिन्यामध्ये विक्रीमध्ये मोठी घट झाली होती. त्यापेक्षा मे महिन्यातील स्थिती थोडीशी बरी असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे येथील अनेक कारखाने बंदच होते. त्यामुळे त्यांचे उत्पादन तसेच वितरण घटले.