Join us  

विक्रीचा मारा; सेन्सेक्स २५ हजारांच्या खाली

By admin | Published: September 08, 2015 4:19 AM

चीनमधील आर्थिक संकट, मान्सूनची तूट आणि घसरलेला रुपया यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारांत मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0८ अंकांनी घसरून

मुंबई : चीनमधील आर्थिक संकट, मान्सूनची तूट आणि घसरलेला रुपया यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारांत मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0८ अंकांनी घसरून २४,८९३.८१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स २५ हजार अंकांच्या खाली गेला असून हा १५ महिन्यांचा नीचांक ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,६00 अंकांच्या खाली गेला आहे.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. एका क्षणी तो २५,३८७.३२ अंकांपर्यंत वर चढला होता. त्यानंतर अचानक नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे सेन्सेक्स घसरला. सत्राच्या अखेरीस ३0८.0९ अंकांची अथवा १.२२ टक्क्यांची घसरण नोंदवून तो २४,८९३.८१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची ही ४ जून २0१४ नंतरची नीचांकी पातळी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २४,८0५.८३ अंकांवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९६.२५ अंकांनी अथवा १.२६ टक्क्यांनी घसरून ७,५५८.८0 अंकांवर बंद झाला. १५ जुलै २0१५ नंतरची ही त्याची नीचांकी पातळी ठरली आहे. घसरणीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत अ‍ॅक्सिस बँक, वेदांता, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, लुपीन, भेल, डॉ. रेड्डीज, कोल इंडिया, सन फार्मा, एनटीपीसी, एलअँडटी, एसबीआय, टाटा स्टील, गेल, इन्फोसिस, एचयूएल, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारती एअरटेल, बजाज आॅटो आणि हीरोमोटोकॉर्प यांचा समावेश आहे. क्षेत्रनिहाय विचार करता आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक २.५७ टक्क्यांनी घसरला. त्यापाठोपाठ बँकेक्स, पॉवर, कॅपिटल गुडस्, रिअल्टी आणि पीएसयू हे निर्देशांक घसरले. युरोपीय बाजारांतही सकाळी तेजीचे वातावरण दिसून आले. चीनचा वृद्धीदर २५ वर्षांच्या नीचांकावरचीनचा शेअर बाजार गेले चार दिवस बंद होता. सोमवारी ते घसरणीनेच सुरू झाले. चीनने २0१४ मधील आपल्या वाढीचा आकडा ७.४ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांवर आणला आहे. 0.१ टक्क्याची घट केल्यानंतर चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ५ अब्ज डॉलरची तूट येणार आहे. चीनचा वृद्धीदर २५ वर्षांच्या नीचांकावर गेला आहे. १९९0 साली हा वृद्धीदर ३.९ टक्के होता. जून महिन्याच्या मध्यापासून चीनचा शेअर बाजार घसरणीला लागला आहे. या काळात चीनचा शेअर बाजार ४0 टक्क्यांनी घसरला आहे. त्या आधीच्या बारा महिन्यांत तो १५0 टक्क्यांनी वाढला होता. जुलैमध्ये चीनने आपल्या चलनात सुमारे ५ टक्क्यांची कपात केली होती.मोदी सरकारला अशीही सलामीआजच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६ मे २0१४ रोजी ज्या पातळीवर होता, त्या पातळीवर गेला आहे. योगायोगाची गोष्ट अशी की, याच दिवशी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शपथ घेतली होती. अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला होता. त्यानंतर सेन्सेक्स वाढलाही; मात्र गेल्या महिनाभरातील घसरगुंडीने बाजार पुन्हा आपल्या पूर्वीच्या पातळीवर पोहोचला आहे. बाजाराला सावरणे हे आता मोदी सरकारसमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे.