कोलकाता : डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ओप्पो आणि विवो यांनी आपल्या ४00 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले आहे. या चिनी कंपन्यांच्या विक्रीत जुलै आणि आॅगस्टमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डोकलाम पेचप्रसंगानंतर भारतात चीनविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्याचा फटका बसून या कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे या कंपन्या संकटात सापडल्या आहेत. या कंपन्यांचे स्मार्टफोन वितरित करणाºया सुमारे ३ डझन वितरण कंपन्यांनाही काही कर्मचारी चीनला परत पाठवावे लागले आहेत. ओप्पो आणि विवोच्या भारतातील प्रमुख उपकंपन्यांनीही आपले कर्मचारी परत पाठविलेले असू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
विवोचे बडे अधिकारी विवेक झांग याच महिन्यात घरी परतले. झांग यांनी इंडियन प्रीमिअर लीगच्या प्रायोजक करारासाठी कंपनीच्या वतीने वाटाघाटी केल्या होत्या, तसेच मुख्य विपणन अधिकारी म्हणून या करारावर स्वाक्षरीही केली होती.
औद्योगिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, डोकलाम पेचप्रसंगानंतर ओप्पो आणि विवो या कंपन्यांच्या विक्रीत ३0 टक्के घट झाली आहे. त्यामुळे चिनी पालक कंपन्यांनी भारतातील स्थानिक व्यवस्थापनात फेरबदल केले आहेत. काही नवीन चेहºयांना भारतात पाठविण्यात आले आहे. चीनविरोधी वातावरण निवळविण्यासाठी नवे कर्मचारी काहीतरी उपाय काढू शकतात, असे या कंपन्यांना वाटते. खरेदीदारांच्या विरोधामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशा या राज्यांत वितरण व्यवस्थेत कंपनीने मूलभूत बदल केले आहेत. महाराष्टÑ आणि प. बंगालमध्येही असेच बदल करण्यात आले आहेत.
या मुद्द्यावर विवोने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ओप्पोच्या प्रवक्त्याने मात्र याला बाजारातील अफवा असे नाव दिले. २0१७ हे वर्ष आमच्यासाठी प्रचंड यशस्वी असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
ओप्पो-विवोची विक्री घटली; ४00 कर्मचारी चीनला परतले, डोकलाम पेचप्रसंगामुळे फटका
डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ओप्पो आणि विवो यांनी आपल्या ४00 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:00 AM2017-08-29T05:00:46+5:302017-08-29T11:27:44+5:30