Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7.5% वाढली प्रवासी वाहनांची विक्री

7.5% वाढली प्रवासी वाहनांची विक्री

एप्रिल महिन्यात भारतातील प्रवासी वाहनांची विक्री ७.५ टक्क्यांनी वाढून २,९८,५0४ गाड्यांवर गेली. आदल्या वर्षी या महिन्यात २,७७,६८३ गाड्या विकल्या गेल्या होत्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:26 AM2018-05-11T01:26:09+5:302018-05-11T01:26:09+5:30

एप्रिल महिन्यात भारतातील प्रवासी वाहनांची विक्री ७.५ टक्क्यांनी वाढून २,९८,५0४ गाड्यांवर गेली. आदल्या वर्षी या महिन्यात २,७७,६८३ गाड्या विकल्या गेल्या होत्या.

 Sales of passenger vehicles increased by 7.5% | 7.5% वाढली प्रवासी वाहनांची विक्री

7.5% वाढली प्रवासी वाहनांची विक्री

नवी दिल्ली - एप्रिल महिन्यात भारतातील प्रवासी वाहनांची विक्री ७.५ टक्क्यांनी वाढून २,९८,५0४ गाड्यांवर गेली. आदल्या वर्षी या महिन्यात २,७७,६८३ गाड्या विकल्या गेल्या होत्या.
भारतीय वाहन उत्पादक संस्थेने (सियाम) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एप्रिलमध्ये देशांतर्गत कार विक्री ४.८९ टक्क्यांनी वाढली. २,00,१८३ कार या महिन्यात विकल्या गेल्या. २0१७च्या एप्रिलमध्ये १,९0,८५४ कार विकल्या गेल्या होत्या. मोटारसायकलींची विक्री तब्बल १९.३८ टक्क्यांनी वाढून १२,२९,५२६ वर गेली. आदल्या वर्षी हा आकडा १0,२९,९६३ होता.

१९,५८,२४१ दुचाकी वाहने यंदाच्या एप्रिलमध्ये विकली गेली. गेल्या वर्षी हा आकडा १६,७४,७८७ इतका होता.

घसघशीत वाढ : सियामने म्हटले की, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ७५.९५ टक्के इतकी घसघशीत वाढ झाली. ७२,९९३ व्यावसायिक वाहने एप्रिलमध्ये विकली गेली. सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री १७.४४ टक्क्यांनी वाढून २३,७९,७१८ वाहनांवर गेली. आदल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये सर्व प्रकारच्या वाहनविक्रीचा एकत्रित आकडा २0,२६,३७३ इतका होता.

सियामची माहिती; कार विक्री 4.89% वाढली

Web Title:  Sales of passenger vehicles increased by 7.5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.