मुंबई : दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये किरकोळ वाढ झाली आहे. नोटाबंदीचा परिणाम आता दूर झाला असल्याचे सांगितले जात आहे. या क्षेत्रातील एक तज्ज्ञ अब्दुल माजीद यांनी सांगितले की, आघाडीची कंपनी असलेल्या हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत वाढ झाली असून, कंपनीने मार्च महिन्यात ६,०९,९५१ वाहनांची विक्री केली आहे.गतवर्षी याच काळात ही विक्री ६,०६,५४२ वाहने एवढी होती. टीव्हीएस मोटर कंपनीच्या विक्रीतही १०.७ टक्के वाढ झाली आहे. मार्च २०१६ मध्ये कंपनीने २,२६,६४३ वाहनांची विक्री केली होती. या वर्षी मार्चमध्ये कंपनीने २,५०,९७९ वाहनांची विक्री केली आहे.
विविध कंपन्यांकडून बीएस३ वाहने कमी किमतीत विक्री झाल्यामुळेही या महिन्यात वाहनांची
विक्री वाढली.
दुचाकी वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये वाढ
दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये किरकोळ वाढ झाली
By admin | Published: April 5, 2017 04:33 AM2017-04-05T04:33:00+5:302017-04-05T04:33:00+5:30