Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेन्शन योजनेत दावा सेटलमेंट त्याच दिवशी; पेन्शन विकास प्राधिकरणाकडून नियम लागू

पेन्शन योजनेत दावा सेटलमेंट त्याच दिवशी; पेन्शन विकास प्राधिकरणाकडून नियम लागू

आतापर्यंत विश्वस्त बँकेला मिळालेल्या योगदानाचे सेटलमेंट दुसऱ्या दिवशी होत असे. या प्रक्रियेला टी-१ असे म्हटले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 07:19 AM2024-07-02T07:19:21+5:302024-07-02T07:19:44+5:30

आतापर्यंत विश्वस्त बँकेला मिळालेल्या योगदानाचे सेटलमेंट दुसऱ्या दिवशी होत असे. या प्रक्रियेला टी-१ असे म्हटले जाते.

Same day claim settlement in pension scheme; Rules enforced by Pension Development Authority | पेन्शन योजनेत दावा सेटलमेंट त्याच दिवशी; पेन्शन विकास प्राधिकरणाकडून नियम लागू

पेन्शन योजनेत दावा सेटलमेंट त्याच दिवशी; पेन्शन विकास प्राधिकरणाकडून नियम लागू

नवी दिल्ली - जुलैमध्ये अनेक वित्तीय नियमांसह ‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’च्या (एनपीएस) सेटलमेंटविषयक नियमांतही बदल झाले आहेत. सेटलमेंटसाठी आता वापरकर्त्यांना अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. ‘पेन्शन निधी नियामक तथा विकास प्राधिकरणा’ने (पीएफआरडीए) यासंबंधी जूनमध्येच एक परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार, एनपीएस योजनेतील सदस्यांना (सब्सक्रायबर) ‘सेम डे सेटलमेंट’ची अनुमती देण्यात आली आहे. 

प्राधिकरणाच्या परिपत्रकात्यानुसार आता सेटलमेंटच्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत विश्वस्त बँकेकडून एनपीएस योगदान गुंतविले जाईल तसेच एनपीएस वापरकर्त्यास शुद्ध मालमत्ता मूल्य (एनएव्ही) लाभ त्याच दिवशी मिळेल. याचाच अर्थ वापरकर्त्याने ११ वाजेपर्यंत योगदान दिले असेल, तर ती रक्कम त्याच दिवशी गुंतविली जाईल. वापरकर्त्यास त्या दिवसाचा लाभही दिला जाणार आहे. 

टी-० व्यवस्था लागू
आतापर्यंत विश्वस्त बँकेला मिळालेल्या योगदानाचे सेटलमेंट दुसऱ्या दिवशी होत असे. या प्रक्रियेला टी-१ असे म्हटले जाते. १ जुलैपासून 
टी-० व्यवस्था सेटलमेंटसाठी लागू झाली आहे. गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुरळीत करणे तसेच व्यवहारांत अधिक दक्षता वाढविणे यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

सदस्य संख्या वाढली
दरम्यान, वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये बिगर-सरकारी क्षेत्राने ९,४७,००० नवीन वापरकर्ते जोडले. त्यामुळे एनपीएसची व्यवस्थापनाधीन संपदा ३०.५ टक्के वाढून ११.७३ लाख कोटी रुपये झाली.

Web Title: Same day claim settlement in pension scheme; Rules enforced by Pension Development Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.