Lokmat Money > बिझनेस न्यूज > सॅमसंग, अ‍ॅपलचा फियास्को

सॅमसंग, अ‍ॅपलचा फियास्को

गॅलॅक्सी नोट-७ स्मार्टफोन प्रकल्प फसल्यामुळे सॅमसंगच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील नफ्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे सॅमसंगचा प्रतिस्पर्धी अ‍ॅपच्या आयफोनच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2016 01:28 AM2016-10-28T01:28:12+5:302016-10-28T01:28:12+5:30

गॅलॅक्सी नोट-७ स्मार्टफोन प्रकल्प फसल्यामुळे सॅमसंगच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील नफ्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे सॅमसंगचा प्रतिस्पर्धी अ‍ॅपच्या आयफोनच्या

Samsung, Apple Fiasco | सॅमसंग, अ‍ॅपलचा फियास्को

सॅमसंग, अ‍ॅपलचा फियास्को

सेऊल : गॅलॅक्सी नोट-७ स्मार्टफोन प्रकल्प फसल्यामुळे सॅमसंगच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील नफ्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे सॅमसंगचा प्रतिस्पर्धी अ‍ॅपच्या आयफोनच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा शुद्ध नफा ४,४00 अब्ज वॉन म्हणजेच ३.९ अब्ज डॉलर राहिला. गेल्या वर्षी याच अवधीत तो ५,३00 अब्ज वॉन होता. वॉन हे दक्षिण कोरियाच्या चलनाचे नाव आहे. अशा प्रकारे कंपनीच्या उत्पन्नात १७ टक्के घसरण झाली आहे. सॅमसंगच्या एकूण उत्पन्नात मोबाईल उद्योगाचा वाटा सर्वाधिक आहे.

आयफोनच्या विक्रीत १९ % घट
अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनच्या विक्रीमध्ये सलग तिसऱ्यांदा घट झाली आहे. आयफोनच्या विक्रीमध्ये तब्बल १९ टक्के कपात झाल्यामुळे कंपनीला ९ बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.
आयफोनला सर्वात जास्त नुकसान चीनच्या बाजारपेठेत झाले असून, त्या देशात आयफोनची विक्रीत 30% घट झाली आहे.
याआधी मार्च २0१५ मध्ये आयफोनच्या विक्रीमध्ये 16.33% घट झाली होती. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत साडेचार कोटी आयफोनच्या विक्रीची नोंद झाली.

Web Title: Samsung, Apple Fiasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.