Join us  

Samsung क्रेडिट कार्ड भारतात लाँच, 20 हजार रुपयांपर्यंत मिळेल कॅशबॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 4:25 PM

Samsung Axis Bank : सॅमसंगच्या क्रेडिट कार्डसह, युजर्स सवलतीसह सॅमसंग उत्पादने खरेदी करण्यास सक्षम असतील. 

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतात क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. दरम्यान, या कार्डसाठी कंपनीने अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. बाजारात अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहेत, परंतु सॅमसंग अॅक्सिस बँक (Samsung Axis Bank) कार्डचे फायदे काय आहेत? त्यासंदर्भात जाणून घेऊया. सॅमसंगच्या क्रेडिट कार्डसह, युजर्स सवलतीसह सॅमसंग उत्पादने खरेदी करण्यास सक्षम असतील. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना Samsung Axis Bank क्रेडिट कार्डने सॅमसंग उत्पादनांवर 10 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. विशेष म्हणजे EMI आणि Non EMI पेमेंटवर 10 टक्के कॅशबॅक उपलब्ध असणार आहे. सॅमसंग या कार्डद्वारे अधिकाधिक ग्राहक मिळवण्याच्या तयारीत आहे. कारण सॅमसंग ही भारतातील स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे आणि टीव्ही, एसी, लॅपटॉप, फ्रीज आणि टॅब्लेट यांसारखी इतर उत्पादने देखील विकते.

सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्हाला केवळ ऑनलाइनच नाही तर ऑफलाइन देखील लाभ देऊ शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिथे जिथे सॅमसंग उत्पादने उपलब्ध असतील, तिथे तुम्हाला या कार्डद्वारे उत्पादनांवर 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. सॅमसंगच्या वेबसाइटवर आणि सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरवरही हे कार्ड काम करेल. कंपनीने सांगितले आहे की, या कार्डद्वारे तुम्हाला सॅमसंग उत्पादनांवर वर्षभर 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

दरम्यान, 10 टक्के कॅशबॅकसह एक अट देखील आहे. अट अशी आहे की, सॅमसंग अॅक्सिस बँक व्हिसा ( Samsung Axis Bank Visa) क्रेडिट कार्डधारकांना वर्षभरात त्यांच्या कार्डवरून फक्त 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. मासिक कॅशबॅक मर्यादा देखील आहे. या कार्डचे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Visa Signature आणि Visa Infinite यांचा समावेश आहे. Visa Signature व्हेरिएंटमध्ये, तुम्हाला एका वर्षात 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल. तर Visa Infinite अंतर्गत, ग्राहकांना एका वर्षात 20 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकेल.

Visa Infinite मध्ये एक महिन्याची मर्यादा देखील अधिक आहे. Visa Signature द्वारे तुम्ही एका महिन्यात जास्तीत जास्त 2500 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता, तर Visa Infinite कार्ड अंतर्गत एका महिन्यात 5000 पर्यंत कॅशबॅक मर्यादा देण्यात आली आहे. एका महिन्यात तुम्ही या कार्डद्वारे सॅमसंग उत्पादनांवर फक्त  2500 रुपये कॅशबॅक मिळवू शकता. इतर फीचर्स स्टँडर्ड Axis क्रेडिट कार्ड सारखीच असतील. दरम्यान, यासंदर्भात तुम्ही बँकेकडून अधिक माहिती मिळवू शकता.

टॅग्स :सॅमसंगबँक