Lokmat Money > बिझनेस न्यूज > Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार?

Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार?

Samsung Layoffs : सॅमसंगने जगभरातील त्यांच्या युनिट्समध्ये 30% पर्यंत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीयांवरही परिणाम होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:50 PM2024-09-13T12:50:08+5:302024-09-13T12:50:57+5:30

Samsung Layoffs : सॅमसंगने जगभरातील त्यांच्या युनिट्समध्ये 30% पर्यंत कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीयांवरही परिणाम होणार आहे.

SAMSUNG will lay off 30% of employees worldwide! Direct impact on India? | Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार?

Samsung Layoffs : SAMSUNG जगभरात 30% कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! भारतावर थेट परिणाम होणार?

Samsung Employee Layoffs : एकीकडे एप्पलने नुकताच आयफोन 16 लॉन्च करुन बाजारात धुमाकूळ घातला आहे. अशात एप्पल कंपनीची तगडी स्पर्धक असलेल्या कंपनी सॅमसंगने मात्र धक्कादायक निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन, टीव्ही आणि मेमरी चिप्स बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने काही विभागांमध्ये 30% परदेशी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रॉयटर्सच्या बातम्यांनुसार, दक्षिण कोरियाच्या सॅमसंगने जगभरातील त्यांच्या सहाय्यक कंपन्यांना सेल आणि मार्केटिंग कर्मचारी सुमारे 15% आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये 30% पर्यंत कपात करण्याचे आदेश दिलेत. आता प्रश्न असा आहे की याचा भारतावर काय परिणाम होणार?

या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचणार
बातम्यांनुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या इतर सुत्रांनी देखील सॅमसंगच्या नियोजित जागतिक कर्मचारी कपातीची पुष्टी केली. किती लोकांना कामावरून काढले जाईल? यात कोणत्या देशांचा समावेश असेल याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. नोकर कपातीची माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने सुत्रांनी नाव जाहीर करण्यास नकार दिला. दरम्यान, परदेशातील ऑपरेशन्समध्ये कर्मचाऱ्यांची कपात नियोजित असल्याचं स्पष्टीकरण सॅमसंगने दिलं आहे. कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले होते. उत्पादन प्रक्रियेत असेलल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

भारतावर कसा परिणाम होणार?
सॅमसंगच्या भारतीय युनिटमध्येही याचे परिणाम पाहायला मिळत आहे. अलिकडच्या आठवड्यात निघून गेलेल्या काही मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांना कंपनीकडून नवीन ऑफर देण्यात येत होती. भारत युनिट सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा 1 हजारपर्यंत पोहोचू शकते. सॅमसंग भारतात अंदाजे 25,000 लोकांना रोजगार देते. सॅमसंगने 2023 च्या अखेरपर्यंत एकूण 2 लाख 67 हजार 800 लोकांना रोजगार दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार, अर्ध्याहून अधिक किंवा 1 लाख 47 हजार कर्मचारी परदेशात आहेत. यापैकी बहुतेक नोकऱ्या उत्पादन आणि विकास क्षेत्रात आहेत. सेल आणि मार्केटिंग कर्मचारी सुमारे 25 हजार 100 आहेत, तर 27 हजार 800 लोक इतर क्षेत्रात काम करतात.

चीनमधील कर्मचाऱ्यांना मिळाली सूचना
चीनमध्ये, सॅमसंगने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकर कपातीबद्दल माहिती दिली आहे. सेल ऑपरेशन्समधील सुमारे 30% कर्मचाऱ्यांवर याचा थेट परिणाम होण्याची अपेक्षा आहे, असे एका दक्षिण कोरियाच्या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलंय. सॅमसंगच्या प्रमुख युनिट्सवर वाढत्या दबावावेळी ही नोकर कपात होत आहे. सॅमसंगचा ब्रेड-अँड-बटर चिप व्यवसायाला मंदीचा तीव्र फटका बसला आहे. या उद्योगाचा गेल्या वर्षी नफा 15 वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला. हे संकट टाळण्यासाठी मे मध्ये, सॅमसंगने त्याच्या सेमीकंडक्टर विभागाचे प्रमुखाची उचलबांगडी केली होती.

Web Title: SAMSUNG will lay off 30% of employees worldwide! Direct impact on India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.