Join us  

तब्बल 6 जीबी रॅम असलेला सॅमसंगचा गॅलेक्सी सी-9 लॉन्च

By admin | Published: January 17, 2017 6:39 PM

सॅमसंग कंपनीने आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी सी-9 प्रो लॉन्च केला आहे. या फोनचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फोनमध्ये तब्बल 6 जीबी इतकी रॅम मेमरी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - सॅमसंग कंपनीने आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी सी-9 प्रो लॉन्च केला आहे.  या फोनचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फोनमध्ये तब्बल 6 जीबी इतकी रॅम मेमरी देण्यात आली आहे. तसेच फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दोन्ही बाजूंना देण्यात आला असून फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आलं आहे. 6 जीबी रॅम असलेला हा सॅमसंग कंपनीचा पहिलाच फोन आहे.
 
27 जानेवारीपासून फोनची ऑनलाइन आणि काही ठराविक दुकानांमध्ये  प्री-बूकिंग सुरू होत आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत फोन सर्वत्र उपलब्ध होईल. ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे.  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये कंपनीने हा फोन लॉन्च केला होता.
 
गॅलेक्सी सी-9 प्रो हँडसेट अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालणारा असून, हा 4जी ड्यूअल सिम स्मार्टफोन आहे.  यामध्ये 6 इंचाचा (1080x1920) फूल एचडी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगनला हा डिव्हाइस सपोर्ट करतो. इनबिल्ट स्टोरेज मेमरी 64 जीबी असून, मायक्रोएसडीच्या मदतीने 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. 189 ग्रॅम वजनाच्या या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 4000 एमएएच आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 36,900 रूपये इतकी असणार आहे.