मुंबई : संवत २0७२ चे शेअर बाजारातील शेवटचे सत्र शुक्रवारी गोड झाले. टाटा उद्योग समूहाच्या कंपन्यांनी नव्याने झेप घेतल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे २६ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे २३ अंकांनी वर चढला.संपलेल्या हिंदू संवत वर्षात सेन्सेक्स २,१९८.२५ अंकांनी अथवा ८.२३ टक्क्यांनी वाढला. निफ्टीही ८५४.६५ अंकांनी अथवा १0.९८ टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्स १३५.६७ अंकांनी अथवा 0.४८ टक्क्यांनी घसरला. निफ्टीही ५५.0५ अंकांनी अथवा 0.६३ टक्क्यांनी खाली आला.शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स २७,९४१.५१ अंकांवर बंद झाला. २५.६१ अंकांनी अथवा 0.0९ टक्क्यांची वाढ त्याने मिळविली. निफ्टी २२.७५ अंकांनी अथवा 0.२६ टक्क्यांनी वाढून ८,६३८ अंकांवर बंद झाला. सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर टाटा समूहातील कंपन्यांचे समभाग घसरणीला लागले होते. त्यांनी शुक्रवारी जोरदार पुनरागन केले. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस व टाटा केमिकल्स यांचे समभाग २.६८ टक्क्यांपर्यंत वर चढले. सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. १२ कंपन्यांचे समभाग घसरले. बजाज आॅटोचा समभाग ३.३५ टक्क्यांनी वाढला. टेक महिंद्राचा समभाग ५ टक्क्यांनी वाढला. (प्रतिनिधी)रविवारी मुहूर्ताचे सौदेमुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यामध्ये रविवार, ३0 आॅक्टोबर रोजी मुहूर्ताचे सौदे होणार आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी ६.३0 ते ७.३0 या एक तासाच्या अवधीत हे सौदे होतील. बलिप्रतिपदेनिमित्त सोमवारी दोन्ही बाजार बंद राहणार आहे.
संवतची अखेर गोड झाली...
By admin | Published: October 29, 2016 2:46 AM