Join us

संजय दत्तनं 'या' कंपनीत केली गुंतवणूक, मद्याच्या व्यवसायाशी निगडीत आहे हे स्टार्टअप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 5:26 PM

असे अनेक स्टार्टअप्स आहेत ज्यामध्ये सेलिब्रिटींनी गुंतवणूक केली आहे.

असे अनेक स्टार्टअप्स आहेत ज्यामध्ये सेलिब्रिटींनी गुंतवणूक केली आहे. सुनील शेट्टी, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यानंतर आता संजय दत्तने मुंबईतील अल्कोबेव्ह (अल्कोहोलिक बेव्हरेज) स्टार्टअप फर्ममध्ये स्वारस्य दाखवलंय. संजय दत्तने स्टार्टअप कार्टेल आणि ब्रदर्समध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनी भारतात लिकर ब्रँडचा पोर्टफोलिओ आयात आणि विक्री करण्याच्या प्रक्रियेत कार्यरत आहे.

कंपनीच्या सुरुवातीच्या उत्पादनांपैकी एक स्कॉच व्हिस्की ब्रँड ग्लेनवॉक असेल. कंपनी याची स्कॉटलंडमधून आयात करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. कंपनी भारतात व्होडका, टकीला आणि सिंगल माल्ट ब्रँड देखील आणणार असल्याची माहिती लिव्हिंग लिक्विड्सचे प्रवर्तक मोक्ष सोनी यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना दिली. Zauba Corp नुसार, कार्टेल अँड ब्रदर्स ही एक पार्टनरशीप फर्म असून २८ ऑक्टोबर २०२१ रोजी रजिस्टर्ड झाली आहे.

संजय दत्तची आणखी गुंतवणूकअल्कोवेब स्टार्टअपशिवाय बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही आणखी एका कंपनीत गुंतवणूक केली आहे. ट्रेंडलाइननुसार, संजय दत्तची सायबर मीडिया (इंडिया) लिमिटेडमध्ये १ टक्क्यापेक्षा कमी भागीदारी आहे. सायबर मीडिया हे एक स्पेशलिस्ट मीडिया हाऊस आहे. मीडिया हाऊस जवळपास १२ मीडिया प्रॉपर्टीज चालवते. यामध्ये डेटाक्वेस्ट, पीसीक्वेस्ट, व्हॉइस आणि डेटा, ग्लोबल सर्व्हिसेस, डीक्यू चॅनल्स, डीक्यू वीक (दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता) यांचा समावेश आहे.

टॅग्स :व्यवसायसंजय दत्तगुंतवणूक