Join us

LIC Scheme : 60 नाही, आता वयाच्या 40 व्या वर्षी मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन! LIC ने आणली जबरदस्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:24 AM

Saral Pension Yojana: भारतीय आयुर्विमा महामंडळने (LIC) एक उत्तम योजना लाँच केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करून वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन मिळू शकते.

नवी दिल्ली : Saral Pension Yojana:आत्तापर्यंत तुम्ही 60 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत पेन्शन मिळत असल्याच्या योजना ऐकल्या असतील. मात्र आता पेन्शनसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागणार नाही. भारतीय आयुर्विमा महामंडळने (LIC) एक उत्तम योजना लाँच केली आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करून वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन मिळू शकते. जाणून घ्या, या योजनेबाबत... 

काय आहे सरल पेन्शन योजना?एलआयसीच्या या योजनेचे नाव सरल पेन्शन (Saral Pension)योजना आहे. ही सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये प्रीमियम फक्त पॉलिसी घेताना भरावा लागतो. यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. जर पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर सिंगल प्रीमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल. सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना (इमीडिएट एन्यूटी प्लान) आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते.

ही पेन्शन योजना घेण्याचे दोन मार्गसिंगल लाईफ- यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर राहील, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाईल.

जॉइंट लाईफ- यामध्ये दोन्ही जोडीदारांना कव्हरेज असते. जोपर्यंत प्रायमरी पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील, प्रायमरी पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम त्यांच्या नॉमिनीला दिली जाईल.

कोणाला घेता येऊ शकते सरल पेन्शन योजना? या योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल 80 वर्षे आहे. ही संपूर्ण आयुष्य पॉलिसी असल्याने, पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्यासाठी उपलब्ध असते. सरल पेन्शन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर केली जाऊ शकते.

पेन्शन कधी मिळणार?पेन्शन कधी मिळणार, हे पेन्शनधारकांनी ठरवायचे आहे. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय मिळतात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी पेन्शन घेऊ शकता किंवा तुम्ही ती 12 महिन्यांनी घेऊ शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता, त्या कालावधीत तुमचे पेन्शन येणे सुरू होईल.

किती मिळेल पेन्शन?या सरल पेन्शन योजनेसाठी किती पैसे भरावे लागतील? असा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल. दरम्यान, तुम्हाला ते स्वतः निवडावे लागेल. म्हणजेच, तुम्ही कितीही पेन्शन निवडाल, त्यानुसार तुम्हाला पैसे भरावे लागतील. जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान 1000 रुपये, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावी लागेल. कमाल मर्यादा नाही.

जर तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला असेल, तर तुम्हाला वार्षिक 50250 रुपये मिळू लागतील, जे आयुष्यभर मिळतील. याशिवाय, जर तुम्हाला तुमची जमा केलेली रक्कम मध्येच परत हवी असेल, तर अशा परिस्थितीत 5 टक्के कपात केल्यानंतर, तुम्हाला जमा केलेली रक्कम परत मिळते.

टॅग्स :एलआयसीनिवृत्ती वेतनपैसा