Lokmat Money > बिझनेस न्यूज > सौदीने तेलाच्या किंमती कमी कराव्यात; सर्वांनी व्याजदर कपात करावी; ट्रम्प यांची दावोसमध्ये मागणी

सौदीने तेलाच्या किंमती कमी कराव्यात; सर्वांनी व्याजदर कपात करावी; ट्रम्प यांची दावोसमध्ये मागणी

Davos: ट्रम्प यांनी उद्योजकांना इशारा दिला आहे. अमेरिकेत उत्पादने विकायची असतील तर ती अमेरिकेतच निर्माण करा, नाहीतर टेरिफला तयार रहा असे ट्रम्प म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 23:43 IST2025-01-23T23:41:48+5:302025-01-23T23:43:20+5:30

Davos: ट्रम्प यांनी उद्योजकांना इशारा दिला आहे. अमेरिकेत उत्पादने विकायची असतील तर ती अमेरिकेतच निर्माण करा, नाहीतर टेरिफला तयार रहा असे ट्रम्प म्हणाले.

Saudi Arabia should reduce oil prices; everyone should cut interest rates; Donald Trump demands in Davos | सौदीने तेलाच्या किंमती कमी कराव्यात; सर्वांनी व्याजदर कपात करावी; ट्रम्प यांची दावोसमध्ये मागणी

सौदीने तेलाच्या किंमती कमी कराव्यात; सर्वांनी व्याजदर कपात करावी; ट्रम्प यांची दावोसमध्ये मागणी

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती कमी कराव्यात, जगातील सर्व देशांनी व्याजाचे दर कमी करावेत, अशी मागणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये केली आहे. त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. 

मी ग्रीन न्यू डील संपुष्टात आली आहे. याला मी ग्रीन न्यू स्कॅम म्हणेन. मी एकतर्फी पॅरिस जलवायु समझोत्यातून माघार घेतली आहे. महागड्या इलेक्ट्रीक गाड्यांच्या सक्तीला संपविले आहे. अमेरिकेकडे पृथ्वीवरील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कच्चे तेल आहे. मी त्याचा वापर करणार आहे. मी सौदीला आणि ओपेक देशांना कच्च्या तेलाचे दर कमी करावेत असे सांगत आहे. तुम्हाला ते कमी करावे लागतील, असे ट्रम्प म्हणाले. 

सौदीने कच्च्या तेलाचे दर कमी केले तर रशिया आणि युक्रेन युद्धही संपेल, असेही ट्रम्प म्हणाले. हे वक्तव्य त्यांनी सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या घोषणेनंतर केले आहे. सौदी अमेरिकेत ६०० बिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. सलमान यांनी ट्रम्प यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली होती. 

याचबरोबर ट्रम्प यांनी उद्योजकांना इशारा दिला आहे. अमेरिकेत उत्पादने विकायची असतील तर ती अमेरिकेतच निर्माण करा, नाहीतर टेरिफला तयार रहा असे ट्रम्प म्हणाले. आम्ही तुम्हाला जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात कमी कर देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. कंपन्यांना त्यांची उत्पादने कुठे बनवायची हे निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी, अमेरिकेतील उत्पादन बंद केल्याने आर्थिक परिणाम होतील, जादाचा कर द्यावा लागेल, असे ट्रम्प म्हणाले. 
 

Web Title: Saudi Arabia should reduce oil prices; everyone should cut interest rates; Donald Trump demands in Davos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.