Join us

सौदी अरेबिया भारताला देणार अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल तेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:43 AM

नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबिया भारताला अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल कच्चे तेल देणार आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाकडून मिळणारे अतिरिक्त तेल भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सिंगापूर : नोव्हेंबरमध्ये सौदी अरेबिया भारताला अतिरिक्त ४ दशलक्ष बॅरल कच्चे तेल देणार आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणवर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाकडून मिळणारे अतिरिक्त तेल भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.सौदी अरेबिया हा जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश आहे. तर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेलाची आयात करणारा देश आहे. अमेरिकेच्या वतीने घालण्यात येत असलेल्या निर्बंधांमुळे इराणकडून मिळणाºया तेलाबाबत सध्या अनिश्चितता निर्माण झाली आहे.इराण हा तेल निर्यातदार देशांत (ओपेक) तिसºया क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. इराणविरोधातील अमेरिकेचे निर्बंध ४ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. भारत हा इराणकडून तेल खरेदी करणाºया देशांत दुसºया स्थानावर आहे. चीन पहिल्या स्थानी आहे. अमेरिकी निर्बंधांमुळे अनेक भारतीय रिफायनरींनी इराणचे तेल खरेदी करणे थांबविणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारताला तेलाची चणचण भासू शकते, असे सूत्रांनी सांगितले.माहीतगार सूत्रांनी सांगितले की, तेलाची संभाव्य तूट भरून काढण्यासाठी भारतीय कंपन्या सौदीकडे वळल्या असून, सौदीनेही नोव्हेंबरमध्ये जास्तीचे ४ दशलक्ष बॅरल तेल पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. नोव्हेंबरमध्ये सौदीकडून तेल घेणार असलेल्या कंपन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, मंगलौर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी नोव्हेंबरसाठी प्रत्येकी १ दशलक्ष बॅरल अतिरिक्त तेलाची मागणी नोंदविली आहे. (वृत्तसंस्था)तेलाच्या किमती स्थिरआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर अंदाज कमी केला असला, तरी मायकेल वादळाने अमेरिकी आखातातील ४० टक्के तेल उत्पादन ठप्प झाल्याने तेलाच्या किमती स्थिर राहिल्या.ब्रेंट क्रूडचे दर ८५.०० डॉलर प्रतिबॅरलवर स्थिर राहिले. अमेरिकी लाइट क्रूडचे दर मात्र ५ सेंटांनी उतरून ७४.९१ डॉलर प्रतिबॅरल झाले.

टॅग्स :व्यवसाय