Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० लाखांच्या कर्जावर ५.५ लाखांची बचत करा; केवळ २ हजारांचे प्री-पेमेंट केल्यास मोठा फायदा

१० लाखांच्या कर्जावर ५.५ लाखांची बचत करा; केवळ २ हजारांचे प्री-पेमेंट केल्यास मोठा फायदा

तुमचे लाखो रुपये वाचतात आणि गृहकर्ज मुदतीआधीच संपते. कसे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:44 PM2022-07-23T12:44:25+5:302022-07-23T12:45:19+5:30

तुमचे लाखो रुपये वाचतात आणि गृहकर्ज मुदतीआधीच संपते. कसे? जाणून घ्या...

save 5 5 lakhs on a loan of 10 lakhs prepayment of only 2 thousand is a huge benefit | १० लाखांच्या कर्जावर ५.५ लाखांची बचत करा; केवळ २ हजारांचे प्री-पेमेंट केल्यास मोठा फायदा

१० लाखांच्या कर्जावर ५.५ लाखांची बचत करा; केवळ २ हजारांचे प्री-पेमेंट केल्यास मोठा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क : घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर कसेही असले तरी प्रत्येकासाठी ते आपला महालच असते. घरखरेदी करणे मात्र सोपे नाही. बहुतांश लोक गृहकर्ज घेऊनच घर घेत असतात. जेव्हा बँक अथवा वित्तीय संस्था गृहकर्ज मंजूर करते, तेव्हा त्याच्या पुढच्याच महिन्यापासून तुमच्या कर्जाचा ईएमआय सुरू होतो. ईएमआयचा एक मोठा हिस्सा मुद्दलावर लागणाऱ्या व्याजात जातो. व्याजात जाणाऱ्या रकमेचा काही हिस्सा आपण प्री-पेमेंटच्या माध्यमातून वाचवू शकतो, कसे ते पाहू...

कसा मिळतो फायदा? 

होमफर्स्ट फायनान्ससचे गौरव गुप्ता यांनी सांगितले की, प्री-पेमेंटच्या माध्यमातून व्याजातील मोठी रक्कम वाचविली जाऊ शकते. लोन प्री-पेमेंटमुळे व्याजात जाणारे लाखो रुपये वाचविले जाऊ शकतातच, पण त्याबरोबरच तुमचे कर्जही लवकर फिटते.

प्रकरण-१: तुम्ही पूर्ण अवधीसाठी नियमितपणे ईएमआय भरले तर तुमच्या खिशातून एकूण २३.१६ लाख रुपये बँकेला जातील. यातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच १३.१६ लाख रुपये केवळ व्याजात जातील.

प्रकरण-२: तुम्ही ९,६५० रुपयांच्या ईएमआयबरोबरच २,००० रुपये दर महिन्याला नियमितपणे प्री-पेमेंट केले, तर २० वर्षांचे तुमचे कर्ज १२.८ वर्षांतच संपेल. त्यातून तुमच्या ८८ महिन्यांच्या ईएमआयचे पैसे वाचतील. तुमचे १० लाख रुपयांचे कर्ज असेल, तर ५.५२ लाख रुपयांचे व्याज वाचेल.

कसे आहे प्री-पेमेंटचे गणित? 

असे समजा की, तुम्ही वार्षिक १०% व्याजदराने २० वर्षांच्या मुदतीसाठी १० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. या कर्जावर ईएमआय ९,६५० रुपये इतका बसेल. आपण आपल्या इच्छेने कर्जाच्या ईएमआयपेक्षा जास्तीची रक्कम भरली तर त्यास प्री-पेमेंट असे म्हटले जाते.

असे संपवा मुदतीआधीच कर्ज

तुम्ही त्या महिन्याचा ईएमआय आधीच भरलेला असल्यामुळे प्री-पेमेंटची सर्व रक्कम मुद्दलात जमा होते. त्यामुळे तुमचे मुद्दल दर महिन्यात घटत जाते. दर महिन्याला तुम्हाला कमी रकमेवर व्याज लागते. त्यातून तुमचे लाखो रुपये वाचतात आणि गृहकर्ज मुदतीआधीच संपते.

Web Title: save 5 5 lakhs on a loan of 10 lakhs prepayment of only 2 thousand is a huge benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक