Join us  

दररोज २ रुपयांपेक्षा कमी बचत करून ६० व्या वर्षानंतर मिळवा ३६ हजारांचं पेन्शन; पाहा काय आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 5:04 PM

२०१९ मध्ये सरकारनं सुरू केली होती योजना. वृद्धापकाळात काय असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. 

ठळक मुद्दे२०१९ मध्ये सरकारनं सुरू केली होती योजना.वृद्धापळाता काय असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. 

अनेकांना आपल्या रिटायरमेंटनंतर पुढे काय असा प्रश्न सातत्यानं भेडसावत असतो. नोकरीच्या पहिल्याच दिवसापासून अनेक जण आपल्या रिटायरमेंटच्या प्लॅनबद्दल विचार करत असतात. वृद्धापकाळाल लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करून २०१९ मध्ये पंतप्रधान श्रम योगी मानधन पेन्शन योजनेची (PM Shram Yogi Maandhan Yojna) सुरूवात करण्यात आली होती. या योजनेत कोणी गुंतवणूक केली तर त्याला ६० वर्षांनंतर ३६ हजार रूपयांचं पेन्शन मिळतं. जाणून घेऊया या स्कीमबद्दल अधिक माहिती. 

या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा तर तुमचं वय १८ ते ४० वर्षे यादरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच टॅक्स पेयर्स या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. संबंधित व्यक्ती EPFO, NPS आणि ESIC अंतर्गत कव्हर असू नये, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी असावं आणि अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे बँकेत बचत खातं किंवा जनधन खातं असणं आवश्यत असेल अशा अटी यात आहेत.

काय आहे आवश्यक?अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड, ओळख पत्र, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे.

कसा भराल फॉर्म?सर्वप्रथम maandhan.in/shramyogi या संकेतस्थळाला भेट देऊन लॉग इन करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या क्लिक हिअर टू अप्लाय नाऊ यावर क्लिक करा आणि Self Enrollment ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही आपला मोबाईल क्रमांक दाखल करून प्रोसिडवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, ईमेल आयडी, कॅप्चा कोड भरल्यानंतर ओटीपी येईल, तो त्या ठिकाणी भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून त्याची प्रिन्ट घ्या. 

वयाच्या तुलनेनं प्रीमिअमवयाच्या तुलनेनं तुम्हाला प्रीमिअम भरावा लागणार आहे. ज्याचं वय १८ वर्षे असेल त्याला महिन्याला ५५ रूपये प्रीमिअम द्यावा लागेल. तर ज्याचं वय २५ वर्षे असेल त्यांना महिन्याला ८० रूपये प्रीमिअम द्यावा लागेल. तर ४० वर्षे वय असलेल्या व्यक्तींना २०० रूपये प्रीमिअम द्यावा लागेल. तुम्ही जेवढे पैसे यात गुंतवता तेवढेच पैसे सरकारही तुमच्यावतीनं गुंतवते. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसंच अर्ज करणाऱ्यांचं वेतन १५ हजार रूपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. वृद्धापकाळात लोकांना समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून सरकारनं ही योजना सुरू केली आहे. 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकपैसानिवृत्ती वेतन