Lokmat Money > बिझनेस न्यूज > Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल, जाणून घ्या, ही ट्रिक...

Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल, जाणून घ्या, ही ट्रिक...

Small Savings Schemes : PPF मध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:26 AM2021-08-24T09:26:25+5:302021-08-24T09:27:09+5:30

Small Savings Schemes : PPF मध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. 

save tax and on interest on ppf investemnt here is the trick | Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल, जाणून घ्या, ही ट्रिक...

Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि परतावा सुद्धा मिळेल, जाणून घ्या, ही ट्रिक...

नवी दिल्ली : PPF Tax Saving: पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच PPF गुंतवणुकीचा एक अतिशय जुना आणि विश्वासार्ह स्रोत आहे, जो फक्त चांगला परतावाच देत नाही तर कर वाचविण्यात ही मदत करतो. ही गुंतवणूक E-E-E कॅटेगरीमध्ये येणारी आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर लागत नाही. PPF मध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. 

PPF मध्ये अशी होते गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट 
PPF मध्ये गुंतवणूकदारांना केवळ खात्रीशीर परतावाच मिळत नाही, तर आयकराच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर आयकर सूट देखील मिळते. मात्र, कधीकधी असे होते की PPF गुंतवणुकीची मर्यादा संपल्यानंतरही गुंतवणूकदाराकडे पैसे शिल्लक राहतात आणि ते गुंतवणूक पर्याय शोधत असतात. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदाराचे लग्न झाले तर तो पत्नी किंवा पतीच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो आणि त्यात आणखी दीड लाख रुपयांची स्वतंत्रपणे गुंतवणूक करू शकतो.

PPF गुंतवणुकीवर इतर फायदे
तज्ज्ञांच्या मते, तुमच्या लाइफ पार्टनरच्या नावाने PPF  खाते उघडल्यास गुंतवणूकदाराला PPF गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होईल, दरम्यान, त्यावेळीही आयकर सूट मर्यादा दीड लाख रुपये असेल. दीड लाखाची आयकर सूट मिळाली तरी इतरही अनेक फायदे आहेत. PPF गुंतवणूक मर्यादा दुप्पट होऊन तीन लाख रुपये होते. E-E-E  कॅटेगरीमध्ये आल्यामुळे गुंतवणुकदारांना PPF व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कर सवलत मिळते. 


क्लबिंगच्या तरतुदींचा परिणाम नाही
आयकर विभागाच्या कलम ६४ अन्वये तुमच्या पत्नीकडून मिळणारी कोणतीही रक्कम किंवा भेटवस्तू तुमच्या उत्पन्नात जोडली जाईल. मात्र, PPF च्या बाबतीत E-E-E मुळे पूर्णपणे करमुक्त आहे, क्लबिंगच्या तरतुदींचा कोणताही परिणाम होत नाही.  

विवाहित लोकांसाठी ट्रिक
दुसरीकडे, भविष्यात जेव्हा तुमच्या जोडीदाराचे पीपीएफ खाते मॅच्योर होईल, तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या पीपीएफ खात्यात तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न वर्षानुवर्षे तुमच्या उत्पन्नात जोडले जाईल. त्यामुळे हा पर्याय विवाहित लोकांना पीपीएफ खात्यात त्यांचे योगदान दुप्पट करण्याची संधी देखील देतो. 

ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे आणि एनपीएस, म्युच्युअल फंडांसारखी मार्केट लिंक्ड गुंतवणूक करायची नाही, अशा लोकांसाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, जुलै-सप्टेंबर तिमाहीत पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के निश्चित करण्यात आला आहे.

Web Title: save tax and on interest on ppf investemnt here is the trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.