Join us

Saving: पगारामधून किती करावी बचत आणि किती खर्च? वापरा हे गणित वाचतील अधिक पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 5:31 PM

Saving: महिन्याच्या अखेरीस आपल्याकडे पगारामधून किती बचत झाली पाहिजे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

नोकरदार लोकांना दर महिन्याच्या अखेरीस वेतन मिळते. या वेतनामधून ही मंडळी आपले मासिक खर्च भागवत असतात. मात्र जेव्हा बचतीचा विषय येतो तेव्हा अनेकजण बचत करू शकत नाहीत. तर महिन्याच्या अखेरीस आपल्याकडे पगारामधून किती बचत झाली पाहिजे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पगार आल्यानंतर त्यातून किती खर्च केला पाहिजे आणि किती बचत केली पाहिजे, त्यासाठी कोणतं गणित जुळवलं पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

प्रत्येक व्यक्तीला बचत करणं शक्य होत नाही. प्रत्येकाचा पगार हा वेगवेगळा असतो. तसेच सर्वांचे खर्चही वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत पगार येताच बचत करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. लोक जितकं बचतीवर लक्ष देतील तितकं त्यांचं भविष्य हे सुरक्षित असेल. अशा परिस्थितीत लोकांनी बचतीसाठी एक खास पद्धत वापरली पाहिजे. 

सर्वप्रथम आपल्याला बचत का करायची आहे. कशासाठी करायची आहे हे निश्चित केलं पाहिजे. आपल्या गरजा काय आहेत आणि त्या आपल्या गरजा किती महिने किंवा वर्षांमध्ये पूर्ण करायच्या आहेत, हे लोकांनी पाहिले पाहिजे. आपल्या गरजा समजल्यावर त्यांनी खर्चाचं आकलन केलं पाहिजे.

जेव्हा तुम्हाला तुमच्या गरजा समजतील. तेव्हा त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती खर्च होईल, याची माहिती झाली, तसेच किती काळामध्ये ती गरज पूर्ण करायची आहे, हे समजले की, त्या हिशेबाने किती बचत केली पाहिजे याचं गणित मांडलं पाहिजे. त्यामुळे त्यावेळेच्या हिशेबाने आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचता येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही गणिताच्या हिशेबाने दर महिन्याला आपल्या बचतीची प्लॅनिंग करू शकता.  

टॅग्स :पैसागुंतवणूक