नवी दिल्ली : जर तुम्हाला नोकरीशिवाय महिन्याला 5 ते 6 हजार रुपयांचा नफा हवा असेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची एक खास योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेचे नाव 'पोस्ट ऑफिस मासिक इन्वेस्टमेंट स्कीम' असे आहे. या योजनेच्यामाध्यातून तुम्हाला दरमहिन्याला फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी ग्राहकांना एकाचवेळी गुंतवणूक करावी लागणार आहे.
जाणून घ्या, पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (Post Office Monthly Income Scheme Account -MIS)? - एकाचवेळी महिन्याला गुंतवणूक करुन त्यावर व्याज घेणाऱ्या गुंतवणूकदारांनी ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. या योजनेचा फायदा निवृत्त कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी जास्तकरुन होणार आहे. - या योजनेत खात्यामध्ये मॅच्युरिटी पिरियड पाच वर्षांचा असतो. यामध्ये खातेदाराला जमा झालेल्या पैशांवर दर महिना व्याज मिळते. - गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसच्या या योजनेसाठी 1500 रुपयांमध्ये खाते उघडता येणार आहे. - या योजनेवर सध्या 7.3 टक्के व्याज मिळत आहे. वर्षाला व्याज 12 महिन्यात वितरित केले जाते. जे तुम्हाला दरमहिन्याला मिळणार आहे. - पोस्ट ऑफिसचे हे खाते देशातील कोणताही नागरिक उघडू शकतो. लहान मुलाच्या नावाने सुद्धा तुम्ही हे खाते उघडू शकता. - याशिवाय, ग्राहक सिंगल किंवा ज्वाइंट खाते सुद्धा उघडू शकतात. दोन्ही खातेदारांना रक्कम जमा करण्याची मर्यादा वेगवेगळी आहे. सिंगल खात्यात जास्तीत जास्त 4.5 लाख आहे. तर ज्वाइंट खात्यात 9 लाख रुपयापर्यंत जमा करु शकतात.
(फक्त 200 रुपयांत उघडा पोस्टात खातं, बँकेपेक्षा जलद होतील पैसे दुप्पट)
असे मिळणार महिन्याला 5500 रुपये?जर तुम्ही खात्यात 9 लाख रुपयांची एकाचवेळी गुंतवणूक केली, तर तुमच्या जमा झालेल्या रकमेवर वर्षाला व्याज जवळपास 65,700 रुपयांपर्यंत असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना महिन्याला जवळपास 5500 रुपयांचा नफा मिळणार आहे. एवढेच नाही, तुम्हाला 9 लाख रुपयांच्या मॅच्युरिटी पिरीयडनंतर काही बोनस सुद्धा परत मिळणार आहे.