Lokmat Money > बिझनेस न्यूज > पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दरमहा व्याज 

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दरमहा व्याज 

Post Office Monthly Income Scheme : सरकारी योजना असल्याने पोस्ट ऑफिसची ही योजना अधिक चांगली मानली जाते. त्यामुळे या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:01 PM2021-12-20T17:01:50+5:302021-12-20T17:02:15+5:30

Post Office Monthly Income Scheme : सरकारी योजना असल्याने पोस्ट ऑफिसची ही योजना अधिक चांगली मानली जाते. त्यामुळे या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या... 

savings post office monthly income scheme give you interest every month know about this government scheme | पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दरमहा व्याज 

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दरमहा व्याज 

नवी दिल्ली : महामारीच्या या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात तुमचा खर्च योग्यरित्या व्यवस्थापित करण्यासाठी बचत करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. तुमच्या बचतीचे पैसे योग्य प्रकारे गुंतवून तुम्ही त्यातून चांगली कमाई आणि चांगला परतावा मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर हमी परताव्यासह कमी जोखीम असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत (MIS) गुंतवू शकता.

ही कमी जोखीम असलेली गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळते. ही पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी आहे, ज्यांना एकदा गुंतवणूक केल्यानंतर नियमितपणे पैशांची आवश्यकता असते. सरकारी योजना असल्याने पोस्ट ऑफिसची ही योजना अधिक चांगली मानली जाते. त्यामुळे या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या... 

गुंतवणुकीची रक्कम
या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. एक व्यक्ती म्हणून, या पोस्ट ऑफिस योजनेंतर्गत जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत तुम्ही संयुक्तपणे गुंतवणूक केल्यास या योजनेत 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल. संयुक्तधारक म्हणजे ज्वाइंट होल्डर झाल्यास, दोन्ही व्यक्तींना समान हिस्सा मिळतो.

कोण उघडू करू शकते खाते?
18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही भारतीय व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत (MIS) खाते उघडू शकते. या पोस्ट ऑफिस योजनेत, तीनपेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींचे संयुक्त खाते उघडता येत नाही. या योजनेत अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने त्याचे पालक खाते उघडू शकतात. या पोस्ट ऑफिस योजनेत, अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या खात्याची मर्यादा एखाद्या व्यक्तीने केलेल्या गुंतवणुकीच्या मर्यादेपेक्षा वेगळी असते.

किती मिळते व्याज?
पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत, तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत, खाते उघडल्यानंतर एक महिना पूर्ण होताच व्याज जमा होण्यास सुरवात होते आणि तुमचे खाते मॅच्युअर होईपर्यंत व्याज चालू राहते. जर तुम्ही दरमहा मिळणाऱ्या व्याजावर क्लेम केला नाही, तर तुम्हाला त्या व्याजाच्या रकमेवर कोणत्याही अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही.

Web Title: savings post office monthly income scheme give you interest every month know about this government scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.