Join us

पोस्टातल्या 'या' दोन योजना आहेत खास, भरघोस फायदा देतील हमखास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:11 AM

भारतीय डाक विभाग आपल्याला वेगवेगळ्या बचत योजनांची सुविधा देते.

नवी दिल्लीः भारतीय डाक विभाग आपल्याला वेगवेगळ्या बचत योजनांची सुविधा देते. पोस्टातल्या अशा योजनांचा लाभही होतो. छोट्या छोट्या बचत योजनांमधून चांगला परतावा मिळतो. वरिष्ठ नागरिक बचत खाते आणि छोट्या योजनेंतर्गत मुलींसाठी एक बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास जबरदस्त फायदा मिळतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सीनुसार 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळते. या बचत योजनांच्या माध्यमातून आपली करातूनही सुटका होऊ शकते. पोस्ट ऑफिसमधील योजनांवरील व्याजदरही सरकार ठरवत असून, त्यात तिमाहीच्या आधारावर वाढ होत असते. सध्या या योजनांवर 8.6 टक्क्यांनी व्याज मिळतं. वरिष्ठ नागरिक बचत खाते(एससीएसएस): 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर आपल्याला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये साठवून ठेवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.7 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.6 टक्के व्याज मिळत होते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू होते. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्क्यांहून अधिक व्याज मिळत होते. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि पीपीएफच्या सुरक्षित पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितका चांगला फायदा मिळेल.

सुकन्या समृद्धी योजना- जन्मापासून ते 10 वर्षं वयोगटातील मुलींची खाती या योजनेंतर्गत उघडता येते. दाम्पत्याला दोन मुलींपर्यंत या योजनेत भाग घेता येऊ शकते. कमीत कमी 250 रुपये व अधिकाधिक दीड लक्ष रुपये एका वित्तीय वर्षात मुलीच्या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते. यावर शासनाकडून 8.6 टक्के दराने व्याज दिले जाते. खातेधारकाची किंवा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण किंवा विवाहप्रसंगी खर्चाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी पूर्ण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येते. 21 वर्षे वय पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व झाले असे नमूद आहे.  मुलीच्या पालकांना या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत तिच्या पालकांना या खात्यातील व्यवहार करता येतील, तर मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर तिला खात्याचे व्यवहार करण्यास पात्र समजले जाईल. या खात्याला 21 वर्षांची मुदत आहे.  

टॅग्स :पोस्ट ऑफिस