नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBIमध्ये खातं असल्यास एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने खाते धारकांना केवायसी (KYC) अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. केवायसी अपडेट केलं नसेल तर खातं फ्रीझ केलं जाऊ शकतं. एसबीआयने सार्वजनिक नोटीस जारी करून याबाबत माहिती दिली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Know Your Customer म्हणजेच KYC बँकिंग सिस्टममध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच बँकेकडून खाते धारकांना केवायसी अपडेट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी अपडेट केलेलं नाही अशा ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये 28 फेब्रुवारीपूर्वी केवायसीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नाहीत तर अशी खातं फ्रीझ केलं जाईल असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
KYC अपडेट करण्यासाठी 'या' गोष्टी असणं गरजेचं
- पासपोर्ट
- वोटर आयडी कार्ड
- ड्रायव्हिंग लायसेन्स
- आधार कार्ड
- मनरेगा कार्ड
- पॅन कार्ड
- फोटो
स्टेट बँक ऑफ इंडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना बँक गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी माहिती देतं आहे. ट्विटरवरून वाढत्या गैरव्यवहारांपासून ग्राहकांनी सावध राहण्याची गरज असल्याचं एसबीआयने म्हटलं आहे. ATM कार्डाचे डिटेल्स आणि PIN च्या माध्यमातून पैसे चोरण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे एसबीआयने आपल्या ग्राहकांना ATM कार्ड आणि PIN सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Your ATM CARD & PIN are important. Here are some tips to keep your money - safe & secured. For information, please visit -https://t.co/dqeuQ4j0JIpic.twitter.com/NUaFB6jOmg
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 22, 2020
आरबीआयनं एटीएम कार्डमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. ग्राहकांच्या खात्यातील पैशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. 2020च्या सुरुवातीपासून SBIच्या एटीएममधून कॅश काढण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. SBIच्या ग्राहकांना चांगली बँक सुविधा (Bank Facility) आणि एटीएम व्यवहारातील फसवणूक(Fraud ATM Transaction) यांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. बँकेनं वन टाइम पासवर्ड आधारित पैसे काढण्याची यंत्रणा सुरू केली आहे. याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँकेत नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येणार आहे. हा नियम 10 हजारांहून अधिकची रक्कम काढणार असल्यास लागू होणार आहे.
RBIचा नवा नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम जारी केले आहेत. भारतात बँकांनी कार्ड जारी करताना एटीएम आणि PoSवरच डोमेस्टिक कार्डची परवानगी द्यावी, असंही आरबीआयनं सुचवलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पैशांची देवाण-घेवाण करायची असल्यास वेगळी मंजुरी घ्यावी लागेल. त्याशिवाय ऑनलाइन देवाणघेवाण, कार्ड नसल्यावरचे व्यवहार आणि संपर्कहीन व्यवहार, ग्राहकांना आपल्या कार्डवर देण्यात येणाऱ्या सेवांसंबंधी निश्चित धोरण ठरवावं लागेल. या नव्या नियमांची अंमलबजावणी 16 मार्च, 2020 पासून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पती देशासाठी विनाकारण शहीद झाले; लेकीला शाळेत प्रवेश नाकारल्याने वीरपत्नी हताश
IND Vs NZ : नवदीप सैनीसाठी शार्दूल ठाकूर त्याग करणार? आज टीम इंडियात हे अंतिम शिलेदार खेळणार?
Mumbai Train Update : कांजूरमार्ग स्थानकाजवळ 'रेल रोको', मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
‘झाकली मूठ’ कायम राहावी असाच केंद्र सरकारचा हेतू आहे का?; शिवसेनेचा सवाल
Delhi Election : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात
विचित्र अपघात : रिक्षासह एसटी बस विहिरीत; 25 प्रवासी ठार, 30 जखमी