Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त 23 रुपयांच्या या शेअरनं केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल, 7 दिवसांत पैसा डबल!

फक्त 23 रुपयांच्या या शेअरनं केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल, 7 दिवसांत पैसा डबल!

हा स्टॉक गेल्या सात ट्रेडिंग दिवसांपासून आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:58 PM2022-12-08T15:58:25+5:302022-12-08T15:59:20+5:30

हा स्टॉक गेल्या सात ट्रेडिंग दिवसांपासून आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे.

sbec sugar share only 23 rupees share made the maximum; Investors became rich, money doubled in 7 days | फक्त 23 रुपयांच्या या शेअरनं केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल, 7 दिवसांत पैसा डबल!

फक्त 23 रुपयांच्या या शेअरनं केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल, 7 दिवसांत पैसा डबल!

एका छोट्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. हा शेअर एसबीईसी शुगर लिमिटेडचा (Sbec Sugar Ltd) आहे. या शेअरमध्ये आज पुन्हा 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लगले आहे. यापूर्वी बुधवारीही कंपनीच्या शेअरला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. मोदी ग्रुपचा हा शेअर आज 52 वीकच्या 48.05 रुपये अशा नव्या उंचीवर ट्रेड करत आहे. 

7 दिवसांत 100 टक्क्यांहून अधिकची तेजी - 
हा स्टॉक गेल्या सात ट्रेडिंग दिवसांपासून आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहे. या काळात हा शेअर 23 रुपयांवरून (30 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत) 48.05 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनांना तब्बल 107 टक्क्यांपेक्षाही अधिकचा नफा मिळाला आहे. म्हणजेच केवळ सात दिवसांतच गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपयांचे दोन लाख रुपयांहून अधिक झाले आहेत. यातच हा स्टॉक गेल्या पाच दिवसांत जवळपास 95 टक्क्यांनी वाढला आहे. 1 डिसेंबर रोजी हा शेअर्स 24.50 रुपयांवर पोहोचला आहे. आज म्हणजेच 8 डिसेंबरला हा शेअर 48.05 रुपयांवर ट्रेड करत आहे.

काय करते कंपनी -
एसबीईसी शुगर लिमिटेड ही उमेश मोदी ग्रुपची कंपनी आहे. ही कंपनी साखर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उच्च तंत्रज्ञानावर काम करते. प्रमोटर कंपनी प्रोजेक्ट डिझाइन, इंजिनिअरिंग आणि कंसल्टन्सीमध्ये एक ग्लोबल प्लेअर आहे. एसबीईसी शुगरने पश्चिम युपीतील उसाच्या बेल्टच्या मध्यात असलेल्या आपल्या प्लांटमध्ये टॉप क्वालिटीच्या पांढऱ्या क्रिस्टल साखरेचे प्रोडक्शनही सुरू केले आहे. या युनिटची वार्षिक क्षमता 60,000 टन साखर एवढी होती. ती वाढून आता 120,000 टन प्रति वर्ष अशी करण्यात आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: sbec sugar share only 23 rupees share made the maximum; Investors became rich, money doubled in 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.