Join us

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!, तुम्हालाही 'ही' लिंक मिळाली असेल तर लगेच करा डिलीट, बँकेकडून स्पष्टीकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 3:30 PM

sbi alert : गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यापासून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे, त्यामुळे बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत राहते आणि सल्ला देत राहते.

नवी दिल्ली : एसबीआयने (SBI) आपल्या ४४ कोटी ग्राहकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. एसबीआयने विनामूल्य भेटवस्तूंच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांपासून सावध केले आहे. बँकेने ट्विटरवर आपल्या ग्राहकांना याबद्दल सावध राहण्यास सांगितले आहे. बँकेने आपल्या पोस्टद्वारे सांगितले की, फसवणूक करणारे ग्राहकांना विनामूल्य भेटवस्तूंच्या नावाखाली लिंक पाठवून त्यांची व्यक्तिगत माहिती चोरी करत आहेत.

काय म्हटले आहे एसबीआयने?एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "तुम्हालाही अशा लिंक तुमच्या इनबॉक्समध्ये मिळाल्या आहेत का? तर यावर क्लिक करणे टाळा. या फिशिंग लिंकवर क्लिक केल्याने आपली वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. सतर्क राहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा!

एसबीआयने ट्विट करून ग्राहकांना केले सतर्क>> तुम्ही तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी कोणालाही शेअर करू नये.>> तसेच एसबीआय, आरबीआय, सरकार, कार्यालय, पोलिस आणि केवायसी प्राधिकरणाच्या नावाखाली फोन कॉलपासून सावध रहा.>> याशिवाय, कोणाच्याही सांगण्यावरून तुमच्या फोनवर कोणतेही अॅप किंवा माहिती नसलेल्या सोर्सद्वारे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका.>> अज्ञात लोकांनी पाठवलेल्या मेल आणि मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.>> सोशल मीडिया किंवा संदेश आणि फोनवर तुम्हाला मिळणाऱ्या कोणत्याही बनावट ऑफरपासून सावध राहा.

विसरूनही 'ही' चूक करू नकायाशिवाय बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक किंवा याचे फोटो काढून ठेवल्यासही तुमची माहिती लीक होण्याचा धोका असतो, असे बँकेने म्हटले आहे. तसेच, यामुळे तुमचे खाते पूर्णपणे रिकामे असू शकते. स्टेट बँकेच्या म्हणण्यानुसार, देशातील सर्व ग्राहकांनी पैशांचे व्यवहार करण्यासाठी सार्वजनिक इंटरनेटचा वापर करू नये. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लीक करण्याची भीती नेहमीच असते. दरम्यान, गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यापासून फसवणुकीच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे, त्यामुळे बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत राहते आणि सल्ला देत राहते.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाएसबीआयबँक