Join us  

SBI च्या 46 कोटी ग्राहकांना अलर्ट! कोणत्याही समस्येविना बँकिंग सुविधा हवी असल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:45 PM

sbi alert : बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अलर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना (SBI customers) पॅन कार्ड लवकरात लवकर आधारशी (PAN-Aadhaar Link) लिंक करण्याचे आवाहन करीत आहे. (sbi alert if you want banking service without interruption then complete pan-aadhaar linking)

बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अलर्ट जारी केला आहे. एसबीआयच्या मते, जर एखाद्या ग्राहकाने तसे केले नाही, तर त्या ग्राहकांला बँकिंग सेवेत अडचणी येऊ शकतात. दरम्यान, सध्याच्या स्थितीत आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. 

आधार कार्डशिवाय कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार शक्य नाहीत. बँकांपासून सरकारी योजनांपर्यंत सर्वत्र आधार कार्डची गरज भासते. त्यामुळे पारदर्शकता ठेवण्यासाठी पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. 

काय म्हटले आहे बँकेने?एसबीआयने आपल्या खातेदारांना ३० सप्टेंबरपर्यंत त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. पॅन कार्डला आधार कार्जशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे बँकेने ट्विट केले आहे. 'आम्ही आमच्या ग्राहकांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद घेण्यासाठी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा सल्ला देत आहोत.'

पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया...1) पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचे तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. पहिला एसएमएस आणि दुसरा इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन करता येईल.2) जर तुम्हाला एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक करायचे असेल, तर आपण UIDPAN12 अंकी आधार क्रमांक10 अंकी पॅन क्रमांक 567678 किंवा 56161 वर एसएमएस करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँक