Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करता? मग करा 'हे' मोठं काम अन्यथा खात्यातून गायब होतील पैसे

SBI नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करता? मग करा 'हे' मोठं काम अन्यथा खात्यातून गायब होतील पैसे

SBI alert for netbanking and mobile banking users : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:57 PM2021-08-19T12:57:02+5:302021-08-19T13:02:15+5:30

SBI alert for netbanking and mobile banking users : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.

sbi alert for netbanking and mobile banking users suggests 8 ways to create an unbreakable password | SBI नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करता? मग करा 'हे' मोठं काम अन्यथा खात्यातून गायब होतील पैसे

SBI नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर करता? मग करा 'हे' मोठं काम अन्यथा खात्यातून गायब होतील पैसे

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांना एक महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. जर तुम्ही देखील नेटबँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीमुळे ग्राहकांचं मोठं नुकसान होत आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा नेट बँकिंग पासवर्ड बदलून अशी फसवणूक टाळू शकता. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये स्ट्रॉन्ग आणि अनब्रेकेबल पासवर्ड तयार करण्याचे 8 मार्ग सांगितले आहेत. 

- तुमचा पासवर्ड स्मॉल आणि कॅपिटल अशा दोन्ही लेटर्समध्ये असावा. उदा - aBjsE7uG

- पासवर्डमध्ये संख्या आणि चिन्ह दोन्ही वापरावे. उदा - AbjsE7uG61!@

- कमीत कमी आठ कॅरेक्टर्सचा वापरण करणं आवश्यक आहे. उदा - aBjsE7uG

- कॉमन डिक्शनरीचे शब्द वापरू नये. उदा - itislocked किंवा thisismypassword

- qwerty आणि asdfg सारखे मेमरी कीबोर्ड पथ वापरू नका

- 12345678 किंवा abcdefg सारखे सामान्य पासवर्ड वापरू नये.

- सहज ओळखता येणारे पासवर्ड जसं की-DOORBELL-DOOR8377 वापरू नये.

- पासवर्ड थोडा मोठा असावा. तसेच जन्मतारीख वापरू नये. 

हे लक्षात घेऊन पासवर्ड तयार करा

स्ट्रॉन्ग आणि अनब्रेकेबल पासवर्ड तयार करण्यासाठी, आपण विशेष काळजी घ्यावी की पासवर्डमध्ये वाढदिवस, लग्नाची तारीख यासारख्या तारखा वापरू नयेत. अशा तारखा वापरल्याने पासवर्ड हॅक होण्याची अधिक शक्यता असते. या व्यतिरिक्त, तुमच्या मुलांची नावे किंवा तुमच्या पाळीव प्राण्यांची नावे पासवर्डमध्ये टाळावीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. 

Web Title: sbi alert for netbanking and mobile banking users suggests 8 ways to create an unbreakable password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.