सुट्या नसल्या तरी काही ना काही कारणे काढून जोडून सुट्या घेणाऱ्या सरकारी बँकांनी मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआय आणि पीएनबी बँका उद्या रविवार असूनही आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार आहेत. एरव्ही जेवणाची सुटी झाली म्हणून ग्राहकांना माघारी पाठवून देणाऱ्या एसबीआयनेएलआयसी आयपीओसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
एलआयसी आयपीओ ४ मेपासून खुला झाला आहे आणि ९ मे रोजी बंद होणार आहे. म्हणजेच शनिवार आणि रविवारी गुंतवणूकदार बोली लावू शकणार आहेत. यामुळे स्टेट बँकेने आपल्या शाखा रविवारीही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Here's a good news for all our customers applying for LIC IPO!#LIC#IPO#Investment#Finance#SBI#AmritMahotsav#AzadiKaAmritMahotsavWithSBIpic.twitter.com/FdhxO3iuso
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 6, 2022
बँकेने ट्विट करून याची माहिती दिली आहे. एसबीआयने म्हटले की, 'आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की LIC IPO साठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी, SBI च्या सर्व शाखा 8 मे 2022 रोजी म्हणजेच रविवारी देखील अर्ज स्वीकारण्यासाठी खुल्या राहतील.'
Important Announcement: All PNB Branches shall remain open on Sunday, May 8, 2022 for facilitation in LIC IPO applications through ASBA facility.#ASBA#IPO#Invest#AzadiKaAmritMahotsav#AmritMahotsav@AmritMahotsavpic.twitter.com/wOPKXhb3Ew
— Punjab National Bank (@pnbindia) May 7, 2022
योनो अॅपवरून अर्ज करता येणार...
१७ मे रोजी एलआयसीचा शेअर लिस्टिंग होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्यास सांगितले आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुमचा गुंतवणुकीचा प्रवास आजच सुरू करा! एसबीआयने सांगितले की, योनोवर तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडा, यासाठी तुम्हाला कोणताही ओपनिंग चार्ज लागणार नाही तसेच डीपी एमसी पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षासाठी विशेष सूट दिली जाईल. यापूर्वी एसबीआयने एसबीआय सिक्युरिटीज डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याद्वारे एलआयसी आयपीओ गुंतवणुकीसाठी समान अधिसूचना जारी केली होती. तथापि, गुंतवणूक सुरू करण्यासाठी, ग्राहकांना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे एसबीआयने सांगितले आहे.